II KBC NEWS II
|| नाते विश्वासाचे ||
!! kokanbhumi channel !!

🖥️ कुडाळ | दि.०५ मार्च
कुडाळ येथे महामार्गावर आज पहाटेच्या सुमारास झालेल्या अपघातात सावंतवाडीतील एका युवकांचा मृत्यू झाला आहे. घटना आज सकाळी ५ वाजण्याच्या सुमारास कुडाळ येथे घडली.

सावंतवाडी शहरातील जय अंबे स्वीट मार्टच्या रायका कुटुंबातील युवक रतन प्रकाश रायका (४५, मूळ राजस्थान सध्या रा. सावंतवाडी) यांचा अपघाता दरम्यान जागीच मृत्यू झाला. ही घटना आज सकाळी ५ वाजण्याच्या सुमारास कुडाळ महामार्गांवर घडली. दरम्यान यात अन्य तिघेजण जखमी झाले आहेत. लादु रायका, साई परब व निलू अशी त्यांची नावे आहेत. ते निपाणी येथे जत्रेसाठी गेले होते. तेथून परतत असताना हा अपघात घडला. त्यांना अधिक उपचारासाठी गोवा बांबूळी येथे हलविण्यात आले आहे. तर रतन याचा मृतदेह कुडाळ येथे ठेवण्यात आला असून शवविच्छेदनानंतर तो नातेवाईकांच्या ताब्यात देण्यात येणार आहे.

काही वर्षांपूर्वी रतन यांच्या भावाचे इन्सुली घाटीत झालेल्या अपघातात निधन झाले होते. त्यानंतर या कुटुंबांवर दुसरा आघात झाला आहे. रतन हा इंजिनिअर होता. राजस्थान येथे मायनिंग कंपनीत तो काम करत होता. काही दिवसांपूर्वी तो सावंतवाडीत आला होता. त्यानंतर निपाणी येथे जत्रा असल्यामुळे ते चौघे ही ईको गाडीने सोमवारी सायंकाळी त्या ठिकाणी गेले होते. तिथून परतत असताना हा अपघात घडला.
यावेळी नेमकी गाडी कोण चालवत होते याबाबत अधिक माहिती मिळू शकली नाही. याबाबतची माहिती त्यांच्या नातेवाईकांकडून देण्यात आली. रतनच्या पश्चात पत्नी, वडील, आई आणि छोटी मुलगी असा परिवार आहे.
____________________________________
बातम्या व जाहिरातसाठी संपर्क
संपादक – शैलेश मयेकर
9404778585, 8847701280
____________________________________
👉कोकणभूमी चॅनल (KBC NEWS) च्या व्हाट्सअप चॅनलला जॉईन होण्यासाठी लिंक ला क्लिक करा👈
https://whatsapp.com/channel/0029Va5wSM67j6g0OFP5ud1K
____________________________________

👇कोकणभूमी चॅनल ऑट्सप ग्रुप ला जॉईन व्हा👇
https://chat.whatsapp.com/FQ2fRbfdQI7HyWcNwzm0C6
____________________________________

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!