▪️कारवाईनंतर ग्रामस्थांकडून समाधान…

II KBC NEWS II
|| नाते विश्वासाचे ||
!! kokanbhumi channel !!

🖥️ सावंतवाडी | दि.०५ मार्च
येथील हिरण्यकेशी वनपरिक्षेत्रातील वन सर्वे क्रं २३ या वनविभागाच्या ताब्यात असलेल्या शासकीय वनजमिनीवर अनधिकृतपणे अतिक्रमण करून सदर क्षेत्रात १४ बंगले,४ चौथरे व १ विहीर (सर्व चिरेबंदी बांधकाम) करण्यात आले होते.सदर प्रकरणी महाराष्ट्र जमीन महसूल अधिनियम १९६६ कलम ५३,५४ व ५४(अ)नुसार योग्य तो तपास पूर्ण करून आज मंगळवार दि ५ मार्च रोजी महसूल विभागाच्या व वनविभागाच्या संयुक्त कारवाईने आंबोली हिरण्यकेशी येथील वन सर्वे क्रं २३ मधील क्षेत्रात अतिक्रमण करून बांधकाम केलेले १४ बंगले,४ चौथरे व १ विहीर तसेच सदर क्षेत्रातील इतर साहित्य जेसीबीने जमीनदोस्त करण्यात आले आहे.अतिक्रमण निष्कासन कामी झालेला खर्च संबंधित अतिक्रमण करणाऱ्यांच्या नावावर महसुली अभिलेखी बोजा चढविण्यात येणार असल्याचे संबंधित विभागाने सांगितले आहे.अतिक्रमण हटाव प्रकरणी सावंतवाडी पोलीस ठाण्याचे मोठे सहकार्य लाभले.

दरम्यान या कारवाई बाबत प्रशासनाकडून कमालीची गुप्तता पाळण्यात आली होती.विशेष म्हणजे त्या ठिकाणी कार्यरत असलेल्या कर्मचाऱ्यांचे मोबाईल जप्त करण्यात आले होते.
____________________________________
बातम्या व जाहिरातसाठी संपर्क
संपादक – शैलेश मयेकर
9404778585, 8847701280
____________________________________
👉कोकणभूमी चॅनल (KBC NEWS) च्या व्हाट्सअप चॅनलला जॉईन होण्यासाठी लिंक ला क्लिक करा👈
https://whatsapp.com/channel/0029Va5wSM67j6g0OFP5ud1K
____________________________________

👇कोकणभूमी चॅनल ऑट्सप ग्रुप ला जॉईन व्हा👇
https://chat.whatsapp.com/FQ2fRbfdQI7HyWcNwzm0C6
____________________________________

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!