▪️भाजप पक्ष नसून एक परिवार आहे ज्यातून समर्पण, सातत्य, समाजात वावरायला शिकवले…विशाल परब

II KBC NEWS II
|| नाते विश्वासाचे ||
!! kokanbhumi channel !!

🖥️ सावंतवाडी | दि.०६ एप्रिल
भाजप युवा मोर्चा महाराष्ट्र प्रदेश
उपाध्यक्ष विशाल परब यांच्या कार्यालयात भारतीय जनता पक्षाचा ४४ वा वर्धापन दिन मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आला. प्रथम राष्ट्र, नंतर पक्ष, नंतर स्वतः याच मार्गावर चालणाऱ्या भारतीय जनता पक्षाचा आज ४४ वा वर्धापन दिन साजरा करण्यात आला. यानिमित्त भारतीय जनता पक्षाच्या सर्व नेत्यांना, पदाधिकाऱ्यांना, बुथ प्रमुख, शक्ती केंद्र प्रमुख व कार्यकर्त्यांना हार्दिक शुभेच्छा देतो. ज्या पक्षाच्या व्याप्तीची खिल्ली उडवली जायची तो पक्ष आज देशातच नाही तर जगातला सगळ्यात मोठा पक्ष झाला आहे आणि त्याच कारण फक्त एकच आहे की या पक्षाचा केंद्रबिंदू हा पक्षाचा हाडाचा कार्यकर्ता आहे. मला अभिमान आहे की मी भारतीय जनता पक्षाचा कार्यकर्ता आहे असं मत यावेळी विशाल परब यांनी व्यक्त केले.

हा पक्ष नसून एक परिवार आहे जो कार्यकर्त्यांना ज्ञान आणि संस्कार देऊन राष्ट्रकार्यासाठी काम करायला प्रेरित करतो तर या पक्षाने समर्पण, सातत्य शिकवलं, पक्षाने समाजात वावरायला शिकवले. असं मत श्री परब यांनी व्यक्त केल. याप्रसंगी केतन आजगावकर, अमित परब, तेजस माने आदिंसह भाजप पदाधिकारी, कार्यकर्ते उपस्थित होते.
____________________________________
बातम्या व जाहिरातसाठी संपर्क
संपादक – शैलेश मयेकर
9404778585, 8847701280
____________________________________
👉कोकणभूमी चॅनल (KBC NEWS) च्या व्हाट्सअप चॅनलला जॉईन होण्यासाठी लिंक ला क्लिक करा👈
https://whatsapp.com/channel/0029Va5wSM67j6g0OFP5ud1K
____________________________________

👇कोकणभूमी चॅनल ऑट्सप ग्रुप ला जॉईन व्हा👇
https://chat.whatsapp.com/FQ2fRbfdQI7HyWcNwzm0C6
____________________________________

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!