▪️सौ. सुवर्णा राजू सुभेदार ठरल्या खेळ पैठणीच्या मानकरी…

II KBC NEWS II
|| नाते विश्वासाचे ||
!! kokanbhumi channel !!

🖥️ सावंतवाडी | दि.३१ मार्च
कृपासिंधू मित्र मंडळ भटवाडी व ग्रामस्थ यांच्यावतीने तिथीनुसार शिवजयंती उत्सव मोठ्या थाटात साजरा करण्यात आला. गेली ३१ वर्ष कृपासिंधू मित्र मंडळ भटवाडी व ग्रामस्थ शिवजयंती उत्सव साजरा करत आहे.

शिवजयंती निमित्त सकाळी शिवदौड रांगणागडावरून आणण्यात आली ११ वाजता शिवमुर्ती पूजन, सायंकाळी महिलांसाठी खेळ पैठणीचा या कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते.

खेळ पैठणीचा या कार्यक्रमात शुभम धुरी यांनी मनोरंजनात्मक खेळ घेऊनकार्यक्रम यशस्वी केला.

खेळ पैठणी कार्यक्रमाच्या प्रथम विजेत्या विजेत्या सौ. सुवर्णा राजू सुभेदार तर द्वितीय शिंदे मॅडम व तृतीय पेडणेकर मॅडम ठरल्या कार्यक्रमासाठी पैठणी व ट्रॉफी तसेच प्रत्येक महिलेला सहभाग सन्मान चिन्ह देऊन गौरवण्यात आले.

सायंकाळी ७ वा महाराजांची आरती व रात्री मुलांसाठी व महिला पुरुष रेकॉर्ड डान्स व कला सादरीकरण अशा विविध कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले होते. प्रत्येक सहभागी व्यक्तीला प्रमाणपत्र देण्यात आले.
____________________________________
बातम्या व जाहिरातसाठी संपर्क
संपादक – शैलेश मयेकर
9404778585, 8847701280
____________________________________
👉कोकणभूमी चॅनल (KBC NEWS) च्या व्हाट्सअप चॅनलला जॉईन होण्यासाठी लिंक ला क्लिक करा👈
https://whatsapp.com/channel/0029Va5wSM67j6g0OFP5ud1K
____________________________________

👇कोकणभूमी चॅनल ऑट्सप ग्रुप ला जॉईन व्हा👇
https://chat.whatsapp.com/FQ2fRbfdQI7HyWcNwzm0C6
____________________________________

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!