II KBC NEWS II

!! kokanbhumi channel !!
🖥️ सावंतवाडी I दि.३० सप्टेंबर
शिरोडा बायपास येथे चालू गाडीला अचानक आग लागल्याची घटना काल रात्री २ वाजता च्या सुमारास घडली आहे.
याबाबत अधिक माहिती अशी की शिरोडा मार्गे गोव्याच्या दिशेने जाणाऱ्या कँटर म्हणून.07. AJ. 3727 ला शिरोडा बायपास येथे आला असता चालू गाडीला अचानक आग लागली. या आगीमध्ये कँटर पूर्णपणे जळून खाक झाला आहे. ही दुर्घटना मद्यरात्री २ ते २.३० वाजण्याच्या सुमारास घडली. या बाबत वेंगुर्ले पोलीस ठाण्यात कळविण्यात आले आहे.

रेडी येथील अंकुश उर्फ प्रशांत नाईक आपल्या मालकीचा एम. एच. ०७ ए.जे. ३७२७ या क्रमांकाचा कँटर काल शुक्रवारी गाडीत असलेले आरोंदा येथील सामान उतरून रात्री उशिरा प्रशांत नाईक गोव्याला जात होते. गाडी शिरोडा बायपास येथे आली असता गाडीतून खालून धूर येऊ लागला आणि बघता बघता चालत्या गाडीने पेट घेतला. घाबरलेल्या प्रशांत यांनी आपले मामा प्रमोद नाईक यांना फोन करून या दुर्घटनेची माहिती दिली. ते येई पर्यंत आगीने रौद्ररूप घेतले होते. आग विझविण्यासाठी साठी सर्वांकडून प्रयत्न झाले परंतु गाडी पूर्ण जळाली असून मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे. पोलीस आता पंचनामा करण्यासाठी घटनास्थळी दाखल झाले आहेत.
__________________________________
कोकणभूमी ग्रुपला जॉईन होण्यासाठी लिंक
https://chat.whatsapp.com/FQ2fRbfdQI7HyWcNwzm0C6
———————————
बातम्या व जाहिरातसाठी संपर्क
संपादक – शैलेश मयेकर
9404778585,
मदन मुरकर- 9421148673
संजय पिळणकर – 94032 98227
यश माधव- 98199 57223
➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖
👉कोकणभूमी चॅनल (KBC NEWS) च्या व्हाट्सअप चॅनलला जॉईन होण्यासाठी लिंक ला क्लिक करा👈
https://whatsapp.com/channel/0029Va5wSM67j6g0OFP5ud1K

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!