II KBC NEWS II
!! kokanbhumi channel !!

🖥️ सातार्डा I दि.३० ऑक्टोबर
सातार्डा बाजारपेठेत मोकाट गुरांची धडक बसल्याने मडूरा – परबवाडी येथील दुचाकी चालक शिवाजी त्रिंबक परब ( ४८ ) हे गंभीर जख्मी झाले.

श्री परब गंभीर जख्मी झाल्याचे पाहून अपघात ठिकाणी उपस्थित असलेले भाजपाचे शक्ती केंद्रप्रमुख रवी धूपकर, ग्रामपंचायत सदस्य वासुदेव राऊळ, मडूरा – रेखवाडी येथील अभिषेक राऊळ यांनी शिवाजी परब यांना बांबोळी हॉस्पिटलमध्ये दाखल केले. त्याच्यावर अतिदक्षता विभागात उपचार सुरु करण्यात आले.

सातार्डा बाजारपेठेत मोकाट गुरांची समस्या बऱ्याच महिन्यांपासून आहे याविषयी बऱ्याच वेळा ग्रामपंचायत कार्यालयाला कळवून सुद्धा त्याकडे दुर्लक्ष केला जातो असा आरोप यावेळी उपस्थितांकडून करण्यात आला आहे. आतातरी या मोकाट गुरांचा बंदोबस्त करणार का? असा प्रश्न नागरिक करत आहेत.
________________________________
बातम्या व जाहिरातसाठी संपर्क
संपादक – शैलेश मयेकर
9404778585, 8847701280
➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖
👉कोकणभूमी चॅनल (KBC NEWS) च्या व्हाट्सअप चॅनलला जॉईन होण्यासाठी लिंक ला क्लिक करा👈
https://whatsapp.com/channel/0029Va5wSM67j6g0OFP5ud1K
________________________________

👇कोकणभूमी चॅनल ग्रुप ला जॉईन व्हा👇
https://chat.whatsapp.com/FQ2fRbfdQI7HyWcNwzm0C6

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!