▪️माजी नगराध्यक्ष बबन साळगावकर यांचा घणाघात

▪️गोव्यात रोजगारासाठी जातांना मृत झालेल्या युवकांच्या कुटुंबियांना २० लाख शासनाने द्यावेत..!

II KBC NEWS II
|| नाते विश्वासाचे ||
!! kokanbhumi channel !!

🖥️ सावंतवाडी | दि.०७ मार्च
सावंतवाडी मतदार संघांचे विद्यमान आमदार, शालेय शिक्षण तथा मराठी भाषा मंत्री अजून कितीदिवस जनतेची फसवणूक करतील. येथील बेरोजगारांना उदरनिर्वाहसाठी दुसऱ्या राज्यावर किती काळ अवलंबुन राहावं लागणार आहे. असा सवाल माजी नागराध्यक्ष बबन साळगावकर यांनी केला आहे. या संदर्भात त्यांनी प्रसिद्धी पत्रक दिले आहे. गेली साडेचौदा वर्ष दीपक केसरकर तरुणांना रोजगाराची गाजर दाखवत आहेत, लोकांना अजून किती दिवस उल्लू बनवणार आहात?नोकरीच्या निमित्ताने गोव्यामध्ये जाणारे तरुणांचे रस्त्यात बळी जात आहे असे अजून किती दिवस चालणार आहेत. यांच उत्तर द्यावं. तसेच अजून किती बळी घेणार असा घेणाघात श्री साळगावकर यांनी केसरकरांवर केली आहे.

गेली कित्तेक वर्षे आडाळी एम आय डीसी येथे उद्योग आणणार म्हनुन जनतेला गाजर दाखवत आहेत. परंतु आज पर्यंत एकही प्रकल्प उभा का राहू शकला नाही आता रोजगारासाठी गोव्याला जाणाऱ्या तरुणांचे किती बळी हवेत तुम्हाला आपल्या स्वार्थासाठी अजून किती दिवस लोकांच्या तोंडाला पाने पुसणार आहात येथील जनता तुम्हाला तुमची जागा दाखविल्या शिवाय राहणार नाही.

केसरकर तुमच्या सततच्या घोषणांनी लोक आता कंटाळले आहेत.२००७ मध्ये घोषणा केलेला आंबोलीतील पर्यटन विकास महामंडळाचा प्रकल्प सुरू झाला असता तर तेथे ५० स्थानिक तरुण नोकरीला लागले असते फक्त पर्यटनाची वाल्गना करायचे आणि मुंबईला निघून जायचं हे केसरकर जनता आता माफ करणार नाही.

येथील अनेक तरुण तरुणी आपल्या कुटूंबाच्या उदरनिर्वाहसाठी गोव्यात नोकरीसाठी जात असताना त्यांचा अपघात होऊन दुर्दैवी मृत्यू पडले हे सत्य आहे. आपल्या घरच्या हाता तोंडाशी आलेल्या कमवता मुलगा मुलगी नोकरीसाठी बाहेर पडून जातात परंतु घरात परतून येतील याची शाश्वती आता पालकांना नाही दीपक केसरकर आणखी किती वर्ष तुम्हाला आमदारकी हवी आहे यासाठी लोकांची फसवणूक करणार आहात. आता बस करा आपल्या कडून जनतेला शास्वत विकासाची अपेक्षा होती पण तुमच्याकडे लोकांच्या प्रश्नासाठी वेळ नाही, तुम्ही जिल्यात सकाळी येता आणि सध्याळी निघून जाता तुमच्या मनमानी कारभारामुळे येथील अनेकाना जीव गमवावे लागत आहेत त्याला सर्वस्वी जबाबदार केसरकर तुम्ही आहात असा आरोप श्री साळगावकर यांनी केला आहे. यावेळी मागील वीस वर्षांमध्ये सिंधुदुर्ग जिल्ह्यातील गोव्यामध्ये नोकरीच्या निमित्ताने असताना मृत्युमुखी पडलेल्या तरुण-तरुणींना महाराष्ट्र शासनाने २० लाख रुपयांची मदत करावी आणि ही जबाबदारी सर्वस्वी महाराष्ट्र शासनाची आहे असे त्यांनी सांगितले आहे.
____________________________________
बातम्या व जाहिरातसाठी संपर्क
संपादक – शैलेश मयेकर
9404778585, 8847701280
____________________________________
👉कोकणभूमी चॅनल (KBC NEWS) च्या व्हाट्सअप चॅनलला जॉईन होण्यासाठी लिंक ला क्लिक करा👈
https://whatsapp.com/channel/0029Va5wSM67j6g0OFP5ud1K
____________________________________

👇कोकणभूमी चॅनल ऑट्सप ग्रुप ला जॉईन व्हा👇
https://chat.whatsapp.com/FQ2fRbfdQI7HyWcNwzm0C6
____________________________________

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!