II KBC NEWS II
|| नाते विश्वासाचे ||
!! kokanbhumi channel !!

🖥️ वेंगुर्ला | दि.१५ मार्च
सागरतीर्थ टाक (बागकरवाडी) येथे मोटरसायकलच्या अपघातात वेंगुर्ला – नैचिआड येथील संकेत किशोर पेडणेकर (वय-२५) हा तरुण जागीच ठार झाला.

सविस्तर वृत्त असे की,संकेत हा गोवा येथे मोपा विमानतळावर कामाला होता.तो रात्री कामावरून येताना १२.३० च्या दरम्यान अपघात झाला असावा असे वेंगुर्ला पोलीस निरीक्षक संदीप भोसले यांनी सांगितले,या घटनेची माहिती मध्यरात्री २.३० च्या दरम्यान तेथून जाणाऱ्या टेम्पो चालकाने वेंगुर्ला पोलिसांना माहिती दिल्यानुसार त्याठिकाणी वेंगुर्ला पोलीस तात्काळ घटनास्थळी दाखल झाले.त्यांनी पंचनामा करून मृतदेह ग्रामीण रुग्णालय शिरोडा येथे शवविच्छेदन करण्यासाठी नेण्यात आला.

सदर अपघाताचा तपास वेंगुर्ला पोलीस निरीक्षक संदीप भोसले,हेड कॉन्स्टेबल सुरज पाटील हे करत आहेत.मयत संकेतच्या पश्चात आई,वडील व बहीण असा परिवार आहे.
____________________________________
बातम्या व जाहिरातसाठी संपर्क
संपादक – शैलेश मयेकर
9404778585, 8847701280
____________________________________
👉कोकणभूमी चॅनल (KBC NEWS) च्या व्हाट्सअप चॅनलला जॉईन होण्यासाठी लिंक ला क्लिक करा👈
https://whatsapp.com/channel/0029Va5wSM67j6g0OFP5ud1K
____________________________________

👇कोकणभूमी चॅनल ऑट्सप ग्रुप ला जॉईन व्हा👇
https://chat.whatsapp.com/FQ2fRbfdQI7HyWcNwzm0C6
____________________________________

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!