II KBC NEWS II

!! kokanbhumi channel !!
🖥️ सावंतवाडी I दि.३० सप्टेंबर
काल रात्री मोती तलावात पडलेल्या इसमाची ओळख पटली आहे. मधुकर विठ्ठल गावडे वय ६३ चौकूळ मराठीवाडी येथील राहिवासी आहेत. त्यांचा तोल जाऊन ते काल रात्री तलावात पडले. काल अकरा दिवसाच्या गणपतीची विसर्जन मिरवणूक सुरू असतानाच हा प्रकार घडला होता. सावंतवाडी नगरपालिका प्रशासन व पोलीस यंत्रणेने शोध मोहीम हाती घेतली होती. मात्र आज सकाळी नऊ वाजता तलावातील मृतदेह बाहेर काढण्यात पोलिसांना यश आले.
त्यांच्या पश्चात पत्नी व मुले मुंबई येथे राहतात. त्यांना दारूचे व्यसन होते. दारूच्या नशेत तोल जाऊन ते पाण्यात पडले असावेत असा अंदाज पोलिसांनी व्यक्त केला आहे. मोती तलावात पडलेला मृतदेह बाहेर काढण्यासाठी सावंतवाडी नगरपालिकेचे आरोग्य विभागाचे कर्मचारी दीपक म्हापसेकर व त्यांच्या टीमने व पोलीस यंत्रणेने एकत्रित मोहीम हाती घेतली. तब्बल नऊ ते दहा तासानंतर मृतदेह बाहेर काढण्यात यंत्रणेला यश आले. पोलीस अधिकारी गजानन भालेराव, पोलीस हवालदार मनोज राऊत, अनिल धुरी हे अधिक तपास करीत आहेत.
__________________________________
कोकणभूमी ग्रुपला जॉईन होण्यासाठी लिंक
https://chat.whatsapp.com/FQ2fRbfdQI7HyWcNwzm0C6
———————————
बातम्या व जाहिरातसाठी संपर्क
संपादक – शैलेश मयेकर
9404778585,
मदन मुरकर- 9421148673
संजय पिळणकर – 94032 98227
यश माधव- 98199 57223
➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖
👉कोकणभूमी चॅनल (KBC NEWS) च्या व्हाट्सअप चॅनलला जॉईन होण्यासाठी लिंक ला क्लिक करा👈
https://whatsapp.com/channel/0029Va5wSM67j6g0OFP5ud1K

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!