II KBC NEWS II
!! kokanbhumi channel !!

🖥️ पणजीI संजय पिळणकर : दि.२४ नोव्हेंबर
राज्यातील कुडका येथे युवकाच्या जीन्स पँटच्या खिशातील मोबाईलने मोटारसायकलवरून जात असताना अचानक पेट घेतल्याने सचिन तारकर या युवकाच्या पोटाचा भाग आणि हात भाजला आहे.ही घटना दोन दिवसांपूर्वी कुडका येथे घडली.

या घटनेत तो युवक भाजून जखमी झाल्यामुळे त्याला गोवा वैद्यकीय महाविद्यालयात उपचार घ्यावे लागले. त्या युवकाने सांगितले की, त्याचा एमआय ब्रॅण्डचा मोबाईल पूर्ण चार्ज करून त्याने आपल्या पँटच्या खिशात ठेवला होता. मोटारसायकल चालवीत असताना त्याच्या खिशात काही तरी जळल्याचे लक्षात आले.त्याने मोटारसायकल थांबवून खिशात हात घालून मोबाईल बाहेर काढला तेव्हा त्याला मोबाईल पेटल्याचे दिसले. मोटारसायकलच्या आवाजामुळे त्याला मोबाईलने खिशातच पेट घेतल्याचे लक्षात आले नाही.हात घालुन मोबाईल बाहेर काढल्यामुळे त्याचा हातही भाजला आहे.जखमी सचिनवर गोमेकॉत उपचार करण्यात आले.
____________________________________
बातम्या व जाहिरातसाठी संपर्क
संपादक – शैलेश मयेकर
9404778585, 8847701280
____________________________________
👉कोकणभूमी चॅनल (KBC NEWS) च्या व्हाट्सअप ग्रुपला जॉईन होण्यासाठी लिंक ला क्लिक करा👈
https://whatsapp.com/channel/0029Va5wSM67j6g0OFP5ud1K ____________________________________
👇कोकणभूमी चॅनल ऑट्सप ग्रुप ला जॉईन व्हा👇
https://chat.whatsapp.com/FQ2fRbfdQI7HyWcNwzm0C6

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!