▪️श्री देव बाळवस भजन मंडळ,मुंबार्डेवाडी – सातार्डा प्रथम…

II KBC NEWS II
|| नाते विश्वासाचे ||
!! kokanbhumi channel !!

🖥️ सावंतवाडी | दि.२४ जानेवारी
सातार्डा येथे अयोध्या येथे होत असलेल्या श्रीराम प्राण प्रतिष्ठापनेचे औचित्य साधून श्रीराम प्रतिष्ठान सिंधुदुर्ग पुरस्कृत सातार्डा गाव मर्यादित भजन स्पर्धा श्री देव रवळनाथ मंदिर सातार्डा येथे सोमवार दि २२ जानेवारी रोजी संपन्न झाली.सातार्डा गावात भजन स्पर्धेचे आयोजन प्रथमच करण्यात आले हे विशेष!

या स्पर्धेत प्रथम पारितोषिक श्री देव बाळवस भजन मंडळ,मुंबार्डेवाडी – सातार्डा,द्वितीव पारितोषिक श्री देव ईसोटी भजन मंडळ,केरकरवाडी – सातार्डा,तृतीय पारितोषिक श्री देव रवळनाथ भजन मंडळ सातार्डा तर चतुर्थ पारितोषिक बांदवाडी भजन मंडळ सातार्डा यांना गौरविण्यात आले.

स्पर्धेत उत्कृष्ट गायक म्हणून कृष्णा मयेकर,श्री देव बाळवस,मुंबार्डेवाडी – सातार्डा व दादा शिरोडकर,श्री देव ईसोटी भजन मंडळ,केरकरवाडी – सातार्डा यांना रोख पारितोषिके देऊन गौरविण्यात आले.

या स्पर्धेसाठी परीक्षक म्हणून प्रकाश नाईक,दीपक मेस्त्री, सत्यनारायण कलंगुटकर,शंकर पटेकर यांनी काम पाहिले.
स्पर्धेचे सूत्रसंचालन बंड्या काळे व श्रीराम प्रतिष्ठान सिंधुदुर्गचे अध्यक्ष संजय पिळणकर यांनी केले.यावेळी स्पर्धेला सातार्डा पंचक्रोशीतील रामभक्त व संगीत प्रेमी मोठया संख्येने उपस्थित होते.
____________________________________
बातम्या व जाहिरातसाठी संपर्क
संपादक – शैलेश मयेकर
9404778585, 8847701280
____________________________________
कोकणभूमी चॅनल (KBC NEWS) च्या व्हाट्सअप ग्रुपला जॉईन होण्यासाठी लिंक ला क्लिक करा
https://whatsapp.com/channel/0029Va5wSM67j6g0OFP5ud1K ____________________________________
कोकणभूमी चॅनल ऑट्सप ग्रुप ला जॉईन व्हा
https://chat.whatsapp.com/FQ2fRbfdQI7HyWcNwzm0C6

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!