▪️सिंधुदुर्ग जिल्हा गिर्यारोहण संघटनेचे आवाहन…

II KBC NEWS II
|| नाते विश्वासाचे ||
!! kokanbhumi channel !!

🖥️ वैभववाडी | दि.२३ जानेवारी
शुक्रवार दिनांक २६ जानेवारी रोजी भारताच्या प्रजासत्ताक दिनी जिल्ह्यातील गड-किल्ल्यांवर आयोजित केलेल्या ध्वजारोहण कार्यक्रमात सर्वांनी सहभागी होऊन हा अभिनव उपक्रम यशस्वी करावा असे आवाहन सिंधुदुर्ग जिल्हा गिर्यारोहण संघटनेने केले आहे.

सिंधुदुर्ग जिल्हा गिर्यारोहण संघटना व समविचारी व्यक्ती व संस्था प्रतिनिधी यांची विशेष सभा शारदा वाचनालय कसाल येथे संपन्न झाली. यावेळी या अभिनव उपक्रमाची सविस्तर माहिती व सूचना देण्यात आल्या. तसेच या उपक्रमाला लागणारे साहित्याचे वाटप करण्यात आले.

यावेळी सिंधुदुर्ग जिल्हा गिर्यारोहण संघटनेचे प्र. अध्यक्ष डॉ. कमलेश चव्हाण, सचिव प्रा. श्री. एस. एन. पाटील, सहसचिव श्रीम. दीप्ती मोरे, सदस्य डॉ.गणेश मर्गज, ओंकार नारकर, राजू नारकर, हर्षल नाडकर्णी, डॉ.राज ताडेराव, प्रा.सचिन दहिबावकर, मिलिंद चव्हाण, प्रा. ममता अटक आदी मान्यंवर उपस्थित होते.

सन २०२४ मध्ये हिंदवी स्वराज्याचे संस्थापक छत्रपती शिवाजी महाराज यांच्या राज्याभिषेकाला ३५० वर्षे पूर्ण होत आहेत. याचे औचित्य साधुन अखिल महाराष्ट्र गिर्यारोहण महासंघाने दिनांक २६ जानेवारी, २०२४ रोजी महाराष्ट्र व कर्नाटकातील ३५० किल्ल्यांवर भारतीय तिरंगा ध्वज व भगवा ध्वज फडकवणे तसेच शिवप्रतीमा पूजन व स्वच्छता शपथ घेणे अशा एका अभिनव उपक्रमाचे आयोजन केले आहे.

सिंधुदुर्ग जिल्हा गिर्यारोहण संघटनेने जिल्ह्यातील दुर्गप्रेमी, शिवप्रेमी व समविचारी व्यक्ती व संस्थांच्या सहकार्याने
जिल्ह्यातील जवळपास २४ गड-किल्ल्यांवर ध्वजारोहणाचा कार्यक्रम निश्चित करुन या कार्यक्रमाची जबाबदारी पुढीलप्रमाणे करण्यात आली आहे.

१) सिंधुदुर्ग- डॉ.कमलेश चव्हाण, मालवण (9371739666)
२) सर्जेकोट- डॉ.कमलेश चव्हाण
३) पद्मगड- डॉ.कमलेश चव्हाण
४) राजकोट- श्रीम. दीप्ती मोरे, कुडाळ (9423450352)
५) देवगड- प्रा.श्रीकांत सिरसाठे, देवगड कॉलेज (8421264397)
६) सदानंदगड- प्रा.सचिन दहिबावकर, देवगड कॉलेज (9819070074)
७) विजयदुर्ग- श्री.राजेंद्र परुळेकर, विजयदुर्ग
(9421261662)
८) रामगड- श्री.मिलिंद चव्हाण, दुर्गवीर प्रतिष्ठान (9403229230)
९) भगवंतगड- श्री.मिलिंद चव्हाण
१०) सिद्धगड- ओंकार नारकर, कसाल (9420207646)
११) वेताळगड- प्राचार्य श्री.मिराशी सर,
कट्टा कॉलेज (8806014916)
१२) शिवगड- प्रा.डॉ. राज ताडेराव, फोंडाघाट कॉलेज (9420185772)
१३) खारेपाटण- प्रा.व्हंकळी सर, खारेपाटण कॉलेज (7507444749)
१४) भैरवगड- श्री.पराग मुंडले, कणकवली
(9421147575)
१५) सोनगड- श्री.दिलीप देसाई, कुडाळ (9921717174)
१६) मनोहरगड- श्री. गणेश नाईक, दुर्गमावळा प्रतिष्ठान (9860252825)
१७) मनसंतोषगड- श्री गणेश नाईक
१८)निवती- श्री. अवधूत रेगे, वेंगुर्ला (9069806969)
१९) यशवंतगड- श्री.पप्पु तेंडुलकर,रेडी (9423813987)
२०) वेंगुर्ला कोट- डॉ.सई लिंगवत, वेंगुर्ला (9421268268)
२१) महादेवगड- श्री. राहुल चव्हाण,आंबोली
(8766962170)
२२) हनुमंतगड- डॉ.गणेश मर्गज, सावंतवाडी
(9420209013)
२३) भरतगड- श्री.प्रविण पारकर, मालवण (9420822553)
२४) गगनगड- प्रा.एस.एन. पाटील, वैभववाडी
(9834984411)
या अभिनव शिवकार्यात जिल्ह्यातील जास्तीत जास्त शाळा, महाविद्यालये, शिवप्रेमी, दुर्गप्रेमी संस्था, तरुण मंडळे, माजी सैनिक, स्थानिक प्रशासन, नागरिक व युवा वर्गाने सहभागी व्हावे, असे आवाहन अखिल महाराष्ट्र गिर्यारोहण महासंघ व
सिंधुदुर्ग जिल्हा गिर्यारोहण संघटनेच्या वतीने करण्यात आले आहे. या शिवकार्यात सहभागी होण्यासाठी

या लिंकवरुन आपली नोंदणी करावी. लिंक वरून नोंदणी केलेल्या आणि प्रत्यक्ष कार्यक्रमात सहभागी झालेल्या सर्वांना ई-प्रमाणपत्र दिले जाणार आहे.
या उपक्रमात सहभागी होण्यासाठी गड-किल्ले निहाय जबाबदारी दिलेल्या व्यक्तींशी संपर्क साधावा.
या उपक्रमाच्या अधिक माहितीसाठी प्र.अध्यक्ष डॉ.कमलेश चव्हाण व सचिव प्रा.एस.एन. पाटील यांच्याशी संपर्क साधावा.
____________________________________
बातम्या व जाहिरातसाठी संपर्क
संपादक – शैलेश मयेकर
9404778585, 8847701280
____________________________________
कोकणभूमी चॅनल (KBC NEWS) च्या व्हाट्सअप ग्रुपला जॉईन होण्यासाठी लिंक ला क्लिक करा
https://whatsapp.com/channel/0029Va5wSM67j6g0OFP5ud1K ____________________________________
कोकणभूमी चॅनल ऑट्सप ग्रुप ला जॉईन व्हा
https://chat.whatsapp.com/FQ2fRbfdQI7HyWcNwzm0C6

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!