II KBC NEWS II
|| नाते विश्वासाचे ||
!! kokanbhumi channel !!

🖥️ सावंतवाडी | दि.२४ जानेवारी
सातुळी येथील स्वराज्य ग्रुप आणि सातुळी ग्रामस्थ यांच्या संयुक्त आयोजित करण्यात आलेल्या ४ थ्या जिल्हास्तरीय निमंत्रितांच्या भजन स्पर्धेत अणसुर येथील सद्गुरू प्रासादिक भजन मंडळाने ( बुवा हर्षल मेस्त्री) प्रथम क्रमांक पटकाविला. या स्पर्धेत माणगाव येथील श्री नवतरुण युवक भजन मंडळाने ( बुवा ओंकार कुंभार) द्वितीय क्रमांक तर कणकवली -नागवे येथील श्री मेजारेश्वर प्रासादिक भजन मंडळाने ( बुवा कु अमेय आर्डेकर) तृतीय क्रमांक पटकाविला.

स्पर्धेचा उर्वरित निकाल पुढीलप्रमाणे उत्तेजनार्थ कोटेश्वर प्रासादिक भजन मंडळ (हरकुळ बुद्रुक) बुवा सुजित परब, उत्कृष्ट हार्मोनियम बुवा आत्माराम कवठणकर श्री रवळनाथ नवतरुण प्रासादिक भजन मंडळ (ओटवणे), उत्कृष्ट गायक श्री अमित उमळकर प्रासादिक भजन मंडळ (कुडाळ), उत्कृष्ठ तबला रोशन सावंत श्री सद्गुरू संगीत भजन मंडळ (कुडाळ), उत्कृष्ट पखवाज रामा गवस श्री राष्ट्रोळी प्रासादिक भजन मंडळ (नेतर्डे), उत्कृष्ट झांज शुभम नाईक श्री गवळदेव प्रासादिक भजन मंडळ ( बाव ), उत्कृष्ट कोरस श्री उमळकर प्रासादिक भजन मंडळ (कुडाळ), साईचा गजर दिलीप गवस श्री राष्ट्रोळी प्रासादिक भजन मंडळ (नेतर्डे)

प्रसिद्ध दशावतार हार्मोनियम वादक कै सुभाष लक्ष्‍मण परब यांच्या स्मरणार्थ आयोजित करण्यात आलेल्या या जिल्हास्तरीय भजन स्पर्धेसाठी जिल्ह्यातील ९ भजन संघांना निमंत्रित करण्यात आले होते. या भजन स्पर्धेला भजन रसिकांचा उत्स्फूर्त प्रतिसाद लाभला. स्वराज्य ग्रुपच्या भजन स्पर्धेच्या उत्कृष्ट नियोजनाबद्दल सर्वांनी कौतुक केले. या स्पर्धेसाठी परीक्षक म्हणून पखवाज विशारद डॉ दादा परब प्रसिद्ध भजनी बुवा प्रकाश चिले यांनी काम पाहिले.

या भजन स्पर्धेच्या उद्घाटन प्रसंगी शिवसेना जिल्हाप्रमुख अशोक दळवी सावंतवाडी नगरपालिकेचे माजी उपनगराध्यक्ष राजन पोकळे, माजी उपनगराध्यक्षा अन्नपूर्णा कोरगावकर, चौकुळचे सामाजिक युवा कार्यकर्ते दिनेश गावडे, संजय गांधी निराधार योजनेचे सावंतवाडी तालुका अध्यक्ष गजानन नाटेकर, सातुळी बावळाट ग्रामपंचायतचे सरपंच सोनाली परब, उपसरपंच स्वप्निल परब, स्वराज्य ग्रुपचे अध्यक्ष संतोष कानसे, शिवसेना विभागमुख आनंद वरक, शिवसेना शाखाप्रमुख शशिकांत गावडे, पोलीस पाटील अरुण परब, बाळू कानसे आदी उपस्थित होते.

स्पर्धेच्या पारितोषिक वितरण प्रसंगी सातुळी बावळाटचे उपसरपंच स्वप्निल परब, स्वराज्य ग्रुपचे अध्यक्ष संतोष कानसे, पोलीस पाटील अरुण परब, स्पर्धेचे परीक्षक पखवाज विशारद डॉ दादा परब, प्रसिद्ध भजनी बुवा प्रकाश चिले आदी मान्यवर उपस्थित होते. यावेळी स्पर्धेतील प्रथम क्रमांक प्राप्त भजन मंडळाला अनुक्रमे ७७७७, ५५५५, ३३३३ रुपयाचे आणि उत्तेजनार्थ प्राप्त भजन मंडळाला २२२२ रुपयाचे तसेच वैयक्तिक विजेत्यांना पारितोषिक देऊन गौरविण्यात आले.
____________________________________
बातम्या व जाहिरातसाठी संपर्क
संपादक – शैलेश मयेकर
9404778585, 8847701280
____________________________________
कोकणभूमी चॅनल (KBC NEWS) च्या व्हाट्सअप ग्रुपला जॉईन होण्यासाठी लिंक ला क्लिक करा
https://whatsapp.com/channel/0029Va5wSM67j6g0OFP5ud1K ____________________________________
कोकणभूमी चॅनल ऑट्सप ग्रुप ला जॉईन व्हा
https://chat.whatsapp.com/FQ2fRbfdQI7HyWcNwzm0C6

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!