II KBC NEWS II
!! kokanbhumi channel !!

🖥️ सिंधुदुर्ग | संजय पिळणकर: दि.३१ डिसेंबर
अंगणवाडी कर्मचारी यांचा संप दि ४ डिसेबर पासून महाराष्ट्रभर सुरूच आहे.चिमुकल्यांचा कलकलाट बंद झालाय.पण कुपोषित मुलांचे हाल होऊ नयेत म्हणून आम्हीच सुचविल्याप्रमाणे आयुक्तांनी पोषण आहार बचत गट,पालक,किंवा स्वयंपाकी यांनी शिजवून द्यावा असे आदेश प्रकल्प अधिकारी यांना दि २२ डिसेंबर २०२३ च्या पत्रकातून दिले आहेत.किल्ली पंचनामा करून ताब्यात घेणे सुचविले आहे.घरपोच पोषण आहार साहित्य सुपरवायझरनी स्वतः हजर राहून उतरवून घ्यायचे आहे
असेही पत्रकात म्हटले आहे महत्वाचे म्हणजे रोज आपल्या बीटमधील ५०% अंगणवाड्याना सुपरवायझरनी भेटी द्यायच्या आहेत असेही आयुक्तांचे आदेश आहेत.महाराष्ट्र पर्यवेक्षिका संघाने आयुक्तांच्या पत्राला विरोध करून ही कामेही करणार नाही असे आयुक्ताना कळवून संपाला पाठिंबा दिला आहे.ग्रामसेवक संघ,शिक्षक युनियन्स सर्वानीच संपाला पाठिंबा दिला आहे.तरीही सिंधुदुर्ग जिल्ह्यातील जिल्हा कार्यक्रम अधिकारी सुपरवायझरमार्फत अंगणवाडी कर्मचारी याना दमदाटी करीत आहेत.नोकरीवरून कमी करण्याच्या नोटीसा देत आहेत हे निषेधार्ह आहे. आयुक्तानी आपल्या पत्रात अंगणवाडी कर्मचारी याना काढून टाका.कारवाई करा असे कुठेही म्हटलेले नाही,मग सुपरवायझर तशा नोटीसा देऊन आयुक्तांचा अपमान करीत आहेत असे आमचे म्हणणे आहे.संप चिघळण्याची धंदे सुपरवायझरनी ताबडतोब बंद करावेत असे आवाहन आम्ही युनियनचे वतीने त्यांना करीत आहोत असे कमलताई परुळेकर म्हणाल्या. आपल्यावर आयुक्तांनी टाकलेली जबाबदारी पेलवणे शक्य नसल्यामुळेच नव्या मदतनीसना धमकावणे,जुन्या नव्या सर्वांनाच नोटीसा देणे हे सुपरवायझर करीत आहेत,कोणीही त्यास घाबरण्याची गरज नाही.त्या नोटीसा बेकायदेशीर आहेत.आयुक्त याना आम्ही तसे कळवून अधिकारी यांच्यावर कारवाई करणेस सूचित केले आहे.

आता हत्ती गेला व शेपूट राहिले आहे.दि ३ जानेवारीला क्रांतिज्योती सावित्रीबाई फुले यांचे जन्मदिनी मुंबईत प्रचंड मोर्चाचे आयोजन कृती समितीने केले आहे.आपण मोठ्या संख्येने १० वाजता आझाद मैदानावर जमावे असे आवाहन कमलताई परुळेकर यानी केले आहे.
____________________________________
बातम्या व जाहिरातसाठी संपर्क
संपादक – शैलेश मयेकर
9404778585, 8847701280
____________________________________
कोकणभूमी चॅनल (KBC NEWS) च्या व्हाट्सअप ग्रुपला जॉईन होण्यासाठी लिंक ला क्लिक करा
https://whatsapp.com/channel/0029Va5wSM67j6g0OFP5ud1K ____________________________________
कोकणभूमी चॅनल ऑट्सप ग्रुप ला जॉईन व्हा
https://chat.whatsapp.com/FQ2fRbfdQI7HyWcNwzm0C6

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!