II KBC NEWS II
!! kokanbhumi channel !!

🖥️ सावंतवाडी | दि.३१ डिसेंबर
सिंधुदुर्ग जिल्ह्यात सावंतवाडी पत्रकार समितीकडून सर्वाधिक उपयुक्त उपक्रम सुरू केले असून श्लोक पठण व गीताई सारख्या आगळ्यावेगळ्या उपक्रमामुळे मुलांना व्यासपीठावर बोलण्याची संधी उपलब्ध झाली आहे रंगभरण चित्र स्पर्धेला मोठा प्रतिसाद मिळाला
तसेच निसर्ग रम्य ठिकाणी ही स्पर्धा होत आहे यालाही मोठा
प्रतिसाद मिळाला आहे
तालुका पत्रकार संघ आणि वृक्षवल्ली यांच्या संयुक्त विद्यमाने आयोजित उपक्रमाला शुभेच्छा सिंधुदुर्ग जिल्हा पत्रकार संघाचे जिल्हाध्यक्ष उमेश तोरस्कर यांनी दिल्या.

मळगाव येथे सावंतवाडी तालुका पत्रकार संघ व वृक्षवल्ली डेव्हलपर्स यांच्या संयुक्त विद्यमाने जिल्हास्तरीय श्लोक पठण स्पर्धेचे उद्घाटन वृक्षवल्ली डेव्हलपर्सचे प्रोप्रायटर विजय नाईक यांच्या हस्ते झाले तर कार्यक्रमाचे अध्यक्ष स्थानी
जेष्ठ पत्रकार श्री अभिमन्यू लोंढे यांच्या होते

जिल्हास्तरीय श्लोक पठण स्पर्धेला मोठ्या संख्येने स्पर्धकांनी सहभाग दर्शवल्यामुळे आयोजकांना देखील असे कार्यक्रम करायला मोठी प्रेरणा मिळते असे गौरवोद्गार उदगार सावंतवाडीतील ज्येष्ठ पत्रकार अभिमन्यू लोंढे यांनी काढले. दरम्यान, सावंतवाडी तालुका पत्रकार संघ हे नेहमीच विविध सामाजिक उपक्रम विद्यार्थ्यांसाठी राबवत असतात, यात पालकांनी, मुलांनी सहभाग नोंदवावा असे आवाहनही श्री लोंढे यांनी यावेळी केले.

लोंढे म्हणाले की, आज कालच्या जगात मोबाईलमुळे अनेक युवा वर्ग अशा स्पर्धेमध्ये सहभाग कमी नोंदवतात. परंतु आज विद्यार्थ्यांनी व विशेषता पालकांनी पुढाकार घेतला त्याबद्दल त्यांचे देखील मी अभिनंदन करतो. त्यामुळे पालकांनी आपल्या विद्यार्थ्यांना अशा स्पर्धेंना सहभाग दर्शवण्यासाठी यापुढे देखील पुढाकार घ्यावा असेही अभिमन्यू लोंढे यावेळी बोलताना म्हणाले. तसेच प्रत्येक विद्यार्थ्याने स्पर्धेमध्ये भाग घेताना विजयाची आशा न बाळगता आपले श्लोक कशाप्रकारे सादर करताल याकडे लक्ष द्यावा असे ते यावेळी बोलताना म्हणाले.

यावेळी जिल्हा पत्रकार संघाचे अध्यक्ष उमेश तोरस्कर, तालुका पत्रकार संघाचे अध्यक्ष हरिश्चंद्र पवार, डिजिटल मीडिया पत्रकार संघाचे जिल्हाध्यक्ष अमोल टेंबकर, तालुका सचिव मयूर चराठकर, खजिनदार रामचंद्र कुडाळकर, माजी तालुकाध्यक्ष प्रवीण मांजरेकर, निलेश मोरजकर, हर्षवर्धन धारणकर प्रवीण परब, हेमंत मराठे,मंगल नाईक भुवन नाईक,लुमा जाधव, अजित दळवी, आशुतोष मांगले,सिद्धेश नाईक, कौस्तुभ पेडणेकर प्रसन्न गोंदावळे,आदी उपस्थित होते
कार्यक्रमाचे सूत्रसंचालन माजी अध्यक्ष प्रवीण मांजरेकर, प्रास्ताविक तालुका अध्यक्ष हरिश्चंद्र पवार यांनी केले.ही स्पर्धा आयोजित करण्यामागे मुलांना श्लोकाचे अनुकरण करताना यावे जुने ते जपण्याचा प्रयत्न करत आहोत.

यावेळी वृक्षवल्ली डेव्हलपर्सचे प्रोप्रायटर सिद्धेश नाईक यांनी उपक्रमाची माहिती दिली,तर आभारप्रदर्शन प्रवीण मांजरेकर यांनी केले.
____________________________________
बातम्या व जाहिरातसाठी संपर्क
संपादक – शैलेश मयेकर
9404778585, 8847701280
____________________________________
कोकणभूमी चॅनल (KBC NEWS) च्या व्हाट्सअप ग्रुपला जॉईन होण्यासाठी लिंक ला क्लिक करा
https://whatsapp.com/channel/0029Va5wSM67j6g0OFP5ud1K ____________________________________
कोकणभूमी चॅनल ऑट्सप ग्रुप ला जॉईन व्हा
https://chat.whatsapp.com/FQ2fRbfdQI7HyWcNwzm0C6

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!