तर उपाध्यक्षपदी जेम्स बोर्जीस यांची निवड…

II KBC NEWS II
!! kokanbhumi channel !!

🖥️ सावंतवाडी I दि.२० नोव्हेंबर
सिंधुदुर्ग जिल्हा सहकारी संस्था सेवकांची सहकारी पतसंस्थेची सन २०२३-२८ या पंचवार्षिक निवडणुक बिनविरोध पार पडली. संस्थेच्या पदाधिकाऱ्यांची निवड करण्यासाठी संस्थेचे निवडणुक अधिकारी राजन बा. राणे यांच्या अध्यक्षेखाली सोमवारी सकाळी संपन्न झाली.

यावेळी या सभेत संस्थेचे अध्यक्षपदी सुनील बाबु राऊळ व उपाध्यक्षपदी जेम्स झुजे बोर्जीस यांची बिनविरोध निवड करण्यात आली. तसेच नुतन कार्यकारणी मध्ये संचालकपदी फ्रँकी ॲन्थोनी डॉन्टस, प्रल्हाद लक्ष्मण तावडे, मायकल डायगो आल्मेडा, आशिष इनास परेरा, दिपक पुंडलिक राऊळ, विठ्ठल तुकाराम बिडये, वैदही विद्याधर गावडे, ज्योती प्रसन्ना देसाई, महेश्वर शिवराम कुंभार, अशोक कृष्णा सांगेलकर यांची बिनविरोध निवड झाली आहे.

यावेळी नुतन अध्यक्ष श्री सुनील बाबु राऊळ यांना संस्थेचे अधिकाधिक आर्थिक विकास करण्यासाठी संस्थेत विविध योजना राबवीभवण्याचे सांगितले तसेच संस्थेचा कारभार अधिकाधिक पारदर्शक ठेवण्यासाठी प्रयत्न करणार तसेच ठेविदारांसाठी विविध योजना राबविणार असल्याचे सांगितले.

यावेळी संस्थेचे सर्व नुतन संचालक उपस्थित होते. निवडणुक अधिकारी श्री राजन या. राणे आणि संस्थेचे सचिव श्री. किशोर रावराणे उपस्थित होते. ____________________________________
बातम्या व जाहिरातसाठी संपर्क
संपादक – शैलेश मयेकर
9404778585, 8847701280
____________________________________
👉कोकणभूमी चॅनल (KBC NEWS) च्या व्हाट्सअप ग्रुपला जॉईन होण्यासाठी लिंक ला क्लिक करा👈
https://whatsapp.com/channel/0029Va5wSM67j6g0OFP5ud1K ____________________________________
👇कोकणभूमी चॅनल ऑट्सप ग्रुप ला जॉईन व्हा👇
https://chat.whatsapp.com/FQ2fRbfdQI7HyWcNwzm0C6

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!