▪️रूपेश राऊळांनी दिल्या शुभेच्छा… ठाकरे शिवसेनेकडून अभिनंदन

II KBC NEWS II
!! kokanbhumi channel !!
|| नाते विश्वाचसाचे ||

🖥️ सावंतवाडी | दि.१५ जानेवारी

येथील कॅथलिक पतसंस्थेच्या संचालक पदी उद्धव बाळासाहेब ठाकरे शिवसेनेचे युवा नेते मायकल डिसोजा यांची नियुक्ती करण्यात आली. आज ही निवड प्रकिया झाली. त्यांची संचालक पदी नियुक्ती झाल्यानंतर त्यांचे शिवसेना तालुका प्रमुख रुपेश राऊळ तसेच शिवसेनेच्या पदाधिकाऱ्यांनी अभिनंदन केले. पतसंस्थेचे दिवंगत संचालक फ्रान्सिस डिसोझा यांचे ते सुपुत्र आहेत.

यावेळी उपजिल्हा प्रमुख चंद्रकांत कासार, संदीप मालकर,मेघशाम काजरेकर, अशोक परब , देवेंद्र टेबकर,संदीप गवस, शिवदत्त घोगळे, नामदेव नाईक, चेतन बामने, गोपालकृष्ण फोंडबा,सोनू कासार , महादेव राऊळ, निलेश परब, अनिरुद्ध पाटकर आधी उपस्थित होते.

यावेळी श्री राऊळ यांनी डिसोझा यांना शुभेच्छा दिल्या.यापूर्वी तुमचे वडील फ्रान्सिस डिसोजा यांनी कॅथलिक बँकेत प्रामाणिकपणे काम केले आहे.राजकीय सामाजिक सहकार क्षेत्रात त्यांचे मोठे योगदान होते हाच पायंडा मायकल यांनी आपल्या जीवनात पुढे न्यावा आणि राजकीय जीवनासह सहकार क्षेत्रात आपली प्रगती करावी विशेष करून गरजू लोकांच्या कायम पाठीशी राहावे असे आवाहन राऊळ यांनी केले.
____________________________________
बातम्या व जाहिरातसाठी संपर्क
संपादक – शैलेश मयेकर
9404778585, 8847701280
____________________________________
कोकणभूमी चॅनल (KBC NEWS) च्या व्हाट्सअप ग्रुपला जॉईन होण्यासाठी लिंक ला क्लिक करा
https://whatsapp.com/channel/0029Va5wSM67j6g0OFP5ud1K ____________________________________
कोकणभूमी चॅनल ऑट्सप ग्रुप ला जॉईन व्हा
https://chat.whatsapp.com/FQ2fRbfdQI7HyWcNwzm0C6

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!