▪️व्हाईस चेअरमनपदी पितर लॉरेन्स दिया यांची तर सेकटरी म्हणून मार्टीन झुजे आल्मेडा बिनविरोध निवड

II KBC NEWS II
!! kokanbhumi channel !!

🖥️ सावंतवाडी I दि.३१ ऑक्टोबर
कॅथॉलिक अर्बन को. ऑप. क्रेडिट सोसा. लि. सावंतवाडी या संस्थेची सन २०२३-२४ ते सन २०२८-२९ साठी पंचवार्षिक संचालक निवडणूक बिनविरोध करण्यात आली. या निवडणूकीचे कामकाज निवडणूक निर्णय अधिकारी तथा सहाय्यक निबंधक, सहकारी संस्था सावंतवाडी श्री अ. रा. क्षीरसागर यांनी पाहिले. नुकतेच त्यांच्य अध्यक्षतेखाली झालेल्या सभेत श्रीम. आनमारी जॉन डिसोजा यांची चेअरमनपदी तर पिटर लॉरेन्स दिया यांची व्हाईस चेअरमन म्हणून बिनविरोध निवड करण्यात आली. तसेच सेकटरी म्हणून मार्टीन झुजे आल्मेडा यांची निवड करण्यात आली.

नुतन संचालकांमध्ये श्री. रुजाय जोसेफ रॉड्रीक्स, श्री आगोस्तीन पास्कू फर्नान्डीस, श्री मान झुजे आल्मेडा, श्री जॉय पिटर डॉन्टस, श्री जॉनी पास्कोल फेराव श्री पिटर लॉरेन्स दिया, श्री सेलेस्तीन आंतोन फर्नान्डीस, श्री. जॉकी फर्नान्डीस, श्रीम. आनमारी जॉन डिसोजा, श्रीम मार्शेलीन स्टिफन डिसोजा यांची बिनविरोध निवड झाली होती. सहकाररत्न संस्थेचे संस्थापक अध्यक्ष त्रि.पि.एफ. डॉन्टस असतानाच निवडणूक प्रक्रिया चालू होती. त्यांनी जुन्या संचालकांबरोबर काही नवीन संचालकांना संधी दिली आहे. ख्रि.पि.एफ. डॉन्टस आज आमच्यामध्ये नसलेतरी त्यांचे विचार घेऊन भविष्यात सर्व संचालक उत्तम प्रकारे पतसंस्था वाढीसाठी काम करतील असा विश्वास संस्थेच्या चेअरमन श्री.आनमारी जॉन डिसोजा यांनी व्यक्त केला.
________________________________
बातम्या व जाहिरातसाठी संपर्क
संपादक – शैलेश मयेकर
9404778585, 8847701280
➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖
👉कोकणभूमी चॅनल (KBC NEWS) च्या व्हाट्सअप चॅनलला जॉईन होण्यासाठी लिंक ला क्लिक करा👈
https://whatsapp.com/channel/0029Va5wSM67j6g0OFP5ud1K
________________________________

👇कोकणभूमी चॅनल ग्रुप ला जॉईन व्हा👇
https://chat.whatsapp.com/FQ2fRbfdQI7HyWcNwzm0C6

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!