▪️वाफोली विविध कार्यकारी सहकारी सेवा सोसायटी लि.६३ वी वार्षिक सभा संपन्न….

II KBC NEWS II
!! kokanbhumi channel !!
🖥️ बांदा I दि.१५ सप्टेंबर
वाफोली विविध कार्यकारी सहकारी सेवा सोसायटी लि. वाफोली
६३ व्या वार्षिक सर्वसाधारण सभेची सूचना
(फक्त संस्थेच्या सभासदांसाठी)
वाफोली विविध कार्यकारी सहकारी सेवा सोसायटी लि. वाफोली या संस्थेच्या सभासदांची ६३ वी वार्षिक सर्वसाधारण सभा गुरुवार दि. १४.०९.२०२३ रोजी सकाळी ठिक ११.०० वा. संस्थेचे सभागृह येथे घेण्यात आली.सर्व सभासद वेळेवर उपस्थित होते.सभेपुढील विषय:-
१. दि.२५ ऑगस्ट २०२२ रोजी झालेल्या वार्षिक सर्वसाधारण सभेचे इतिवृत्त वाचून कायम करणे.२.दि.३१ मार्च २०२३ अखेर संपलेल्या आर्थिक वर्षाचा ताळेबंद, नफा-तोटा पत्रक वाचून संमत करणे
आणि नफा वाटणीस मंजूरी देणे.३.सन २०२३- २०२४ सालाकरिता बाहेरील उभारावयाच्या कर्जाची मर्यादा ठरविणे.४.सन २०२२ २०२३ च्या लेखापरिक्षण अहवालाचे वाचन करणे व सन २०२१-२०२२ च्या दोष दुरुस्ती
अहवालाची नोंद घेणे.५.सन २०२३- २०२४ च्या अंदाजपत्रकास मंजूरी देणे.६. सन २०२३ २०२४ साठी लेखापरिक्षकाची नेमणूक करणे.
७.उपविधी दुरुस्तीबाबत.
८.९८ व्या दुरुस्तीनुसार संस्थेचे मयत / संपर्कात नसलेले व अक्रियाशील सभासदांबाबत विचार विनिमय
करणे.
माननीय अध्यक्षांच्या परवानगीने आयत्यावेळी येणाऱ्या विषयावर विचार विनिमय करणे.वार्षिक बैठकसाठी सर्वजण अगत्याने उपस्थित होते त्याबद्दल चेअरमन सौ.धनश्री विलास गवस यांनी सर्वांचे संस्थेच्या संचालक मंडळाच्यावतीने हार्दिक स्वागत केले.विषय पत्रिकेनुसार संस्थेचे कामकाज पार पाडण्यास सर्वांच्या बहुमोल अशा सहकार्याची अपेक्षा केली.
चालू वर्षात नवी उमेद घेऊन संस्था सक्षम करण्यासाठी संचालक मंडळ मनापासून कार्यरत आहे असे मत व्यक्त केले.आर्थिक गरजेच्या वेळी तात्काळ मदत होऊन गरज भागावी हा सामाजिक हेतू डोळ्यासमोर ठेवून संस्थेचा कार्यभाग सुरु आहे. टीका-टिपणी हा तर हक्कच वाटतो,पण कार्यभाग पूर्ण करताना कायदा,नियम व व्यवहार याची सांगड घालणे आवश्यक असते आणि ते तेवढेच कठीणही असते. पण या सगळ्यातून मार्ग काढून संस्था प्रतिनिधी आपले काम व्यवस्थितपणे पार पाडण्याचा प्रयत्न करीत राहणार.संस्थेचे व्यवहार वाढविण्याचे काम सर्वांच्या सहकार्याने सुरु आहेत.अहवाल वर्षांत संस्थेने कर्ज व्यवहार वाढविण्याचा प्रयत्न केला आहे आणि हे सर्व संस्थेच्या सभासदांमुळे शक्य झाले आहे.
अहवाल वर्षात संस्थेने जिल्हा बँकेकडून घेतलेल्या कर्जाची १००% परतफेड केली आहे.त्यासाठी
जिल्हा बँकेकडून संस्थेचा गुणगौरव ही करण्यात आला आहे.अहवाल वर्षात संस्था पातळीवर ही ९५% वसुली
करण्यास संस्था यशस्वी झाली आहे.संस्थेकडे धान्यविभाग असून वाफोली, विलवडे, भालावल अशा तीन गावातील रेशन कार्ड धारकांचा समावेश आहे. अहवाल वर्षात रेशनींग बरोबर शासकीय योजनेतून दिवाळी, गुढीपाडवा या सणावेळी शिधावाटप करण्यात आले. सर्व गावातील रेशनकार्ड धारक व्यवस्थितरित्या सहकार्य करीत आहेत.त्यासाठी संस्थेच्यावतीने सर्व रेशनकार्ड धारकांचे सौ.गवस यांनी आभार व्यक्त केले आहे.
विद्यमान संचालक मंडळ संस्थेच्या प्रगतीसाठी चालू वर्षात संस्था बऱ्याच नवीन योजनांचा समावेश
करणार आहे. स्व-भांडवल अर्थात ठेवी वाढविण्यासाठी संस्था प्रयत्नशील आहे.विविध ठेवींचे प्रकार सुरु करुन संस्थेच्या ठेवींमध्ये वाढ करण्याचा प्रयत्न सुरु आहे. त्यासाठी सर्व सभासदांनी सहकार्य करावे अशी विनंती सौ.गवस यांनी केली आहे.चालू वर्षात संस्था इतर व्यवसाय करुन संस्थेचा व्यवहार वाढविण्याच्या विचाराधीन आहे.
सर्वांचे सहकार्य आणि विश्वास यामुळे संस्था मोठी व मजबूत होत आहे.याचे सारे श्रेय अर्थातच सर्व सभासदांना जाते,असेच सहकार्य सदैव राहू दे.दि. ३१.०३.२०२३ अखेर संपलेल्या सहकारी वर्षाचा वार्षिक अहवाल, ताळेबंद, नफा-तोटा पत्रक व
सन २०२३-२०२४ चे उत्पन्न व खर्चाचे अंदाजपत्रक संचालक मंडळाच्या वतीने मान्यतेकरिता सविनय सादर
करीत आहे. वाफोली विविध कार्यकारी सहकारी सेवा सोसायटी लि. वाफोली
सभासद व भागभांडवल अहवाल वर्षात १० सभासदांची वाढ होवून एकूण सभासद संख्या ६८१ एवढी आहे.यावेळी संस्थेचे अधिकृत भागभांडवलाची कमाल मर्यादा वाचून दाखविण्यात आले.कमाल मर्यादा रु. २५,००,०००/- एवढी आहे.दि. ३१.०३.२०२३ अखेर भागभांडवल रक्कम रु.२१,८४,३४५ /- एवढे आहे. राखीव व इतर निधी अहवाल वर्षाअखेर राखी निधी रक्कम रु. १४,१७, ९५७.८५ एवढा आहे.तर इतर
निधी रु. १४,६०,५०५.२५ एवढ्या आहेत.संस्थेकडे वर्षाअखेर रक्कम रु. २८,७८,४६३. १० एवढा निधी आहे.
संस्थेकडे अहवाल वर्षाअखेर एकूण रु. ७, १८,३८० /- एवढ्या ठेवी आहेत.बँक कर्ज – अहवाल वर्षात संस्थेने बँक कर्जाची परतफेड १००% केली आहे. वित्तीय बँक सिंधुदुर्ग जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेतून शेती तसेच पिक कर्जाचे वापरासाठी आर्थिक सहाय्य घेतलेले आहे. अहवाल वर्षात बँकेकडून रक्कम रु.७४, २९,३४४/- एवढे कर्ज उचल केली असून वर्षाअखेर कर्ज बाकी रक्कम रु. ७३,२७,२१८/- एवढी आहे.
सभासद कर्ज संस्थेने अहवाल वर्षात शेती कर्ज,पिक कर्ज व स्वफंड कर्ज असे एकूण रक्कम रु. ९३,४२,१४० /- एवढे वाटप केले असून अहवाल वर्षअखेर येणे बाकी रक्कम रु. ८९,७१,८०९/- एवढे कर्ज येणे आहे.तरी सर्व सभासदांनी आपल्याकडील कर्ज नियमित भरणा करुन संस्थेस सहकार्य करावे.गुंतवणूक संस्थेचे सिंधुदुर्ग जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेमध्ये रु.७,६०,४५०/- रकमेचे शेअर्स खरेदी केलेले आहेत.मुदत ठेवीमध्ये रु. ३२,१७,९१५/- एवढी गुंतवणूक केलेली आहे. एकूण सिंधुदुर्ग जिल्हा सहकारी बँकेमध्ये व इतर संस्थामध्ये एकूण रक्कम रु. ४०,८२,१९६ /- रकमेची गुंतवणूक केलेली आहे. धान्य माल साठा – संस्थेकडे आर्थिक वर्षाअखेर रक्कम रु. २,६७०.४१ एवढा धान्य साठा शिल्लक होता.
स्थायी मालमत्ता – संस्थेकडे वर्षाअखेर जंगम तसेच स्थावर मालमत्ता रु.८,०२,६६५.७१ एवढ्या रकमेची लेखापरीक्षण अहवाल वर्षाअखेर संस्थेचे लेखापरीक्षण मा.श्री.चंद्रकांत अमृत सावंत, शासकीय प्रमाणित लेखापरिक्षक सहकारी संस्था, सिंधुदुर्ग यांनी केले असून संस्थेला ‘ब’ वर्ग दिला आहे तर
संस्थेच्या ताब्यात आहे.
बँक तपासणी झाली असून मा. श्री.आनंद सावंत यांनी केली आहे. संचालक मंडळ सभा अहवाल वर्षात १२ मासिक सभा घेण्यात आल्या तर विशेष सभा २ झाल्या.एकूण १४ सभा झाल्या आहेत.यावेळी ग्राहक सेवा सुरू करण्यासाठी प्रयत्न करत आहे.संचालक मंडळाने व्यवस्थितरित्या संस्थेचा व्यवहार वाढविण्यासाठी प्रयत्न केला आहे.तसेच आर्थिक वर्षात बँक कर्ज परतफेड १००% केली आहे. तसेच थकीत कर्जदारांच्या भेटी घेवून चालू वर्षी १००% संस्था पातळीवर तर १००% बँक पातळीवर कर्ज वसुली करण्यास संस्था यशस्वी झाली आहे.संस्थेची दैनंदिन कामे पार पाडीत असताना संस्थेच्या सर्वांगीण प्रगतीसाठी वेळोवेळी मा. श्री.माणिक सांगळे साहेब, जिल्हा उपनिबंधक,मा. सौ.उर्मिला यादव मॅडम, कक्ष अधिकारी व त्यांचे कर्मचारी वृंद, मा.श्री.अनिल शिरसागर, सहाय्यक निबंधक सहकारी संस्था, सावंतवाडी व त्यांचे कर्मचारी वृंद,मा.श्रीम. के.मंजुलक्ष्मी मॅडम, जिल्हाधिकारी, सिंधुदुर्ग, सिंधुदुर्ग जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँक मा.श्री.मनिष दळवी साहेब, अध्यक्ष मा.श्री. अतुल काळसेकर साहेब, उपाध्यक्ष,मा. श्री.प्रमोद गावडे साहेब,मुख्य कार्यकारी अधिकारी व संचालक मंडळ आणि बँक कर्मचारी वृंद, तसेच मा.श्री. एस.एच.डम्बे साहेब,सिं.जि. बँक विकास अधिकारी,ता. विकास अधिकारी मा. श्री.एस.परब साहेब व मा.श्री. विलास धुरी साहेब,मा.सौ. चव्हाण मॅडम व कर्मचारी वृंद, सिं.जि.बँक, शाखा बांदा शाखाधिकारी मा.श्री.सिताराम गावडे साहेब व त्यांचे कर्मचारी वृंद,मा. तहसिलदार, सावंतवाडी, जिल्हा पुरवठा अधिकारी व त्यांचे कर्मचारी वृंद,मा.बँक लेखापरिक्षक श्री.आनंद सावंत,वैधानिक लेखापरिक्षक मा.श्री.चंद्रकांत सावंत व त्यांचे कर्मचारी वृंद, तलाठी मा.सौ. वर्षा नाडकर्णी, ग्रामसेवक मा. श्री.प्रसाद ठाकूर,सरपंच मा.श्री.उमेश शिरोडकर, उपसरपंच मा. श्री.विनेश गवस व ग्रामपंचायत सदस्य व ग्रामपंचायत कर्मचारी वृंद, दक्षता कमिटी वाफोलीचे संचालक मंडळ व सभासद, देवस्थान कमिटी अध्यक्ष मा.श्री. विलास गवस, माजी जिल्हा बँक अध्यक्ष मा. श्री.डी.बी. वारंग,मा.श्री. जितेंद्र खानोलकर,श्री देवी पाणी वापर संस्था, वाफोलीचे संचालक मंडळ व सभासद यांनी संस्थेला केलेल्या मार्गदर्शन व लेखापरिक्षण सहकार्याबद्दल सर्वांचे आभार चेअरमन सौ.गवस यांनी मानले.तसेच संस्थेचे सर्व सन्माननीय सभासद, ठेवीदार, कर्जदार,सर्व जाहिरातदार, पत्रकार, जिल्ह्यातील सर्व लोकप्रतिनिधी व इतर ज्ञात-अज्ञात व्यक्ती व संस्था, बँका व हितचिंतक या सर्वांचे आभार मानले.तसेच संस्थेचे कामकाज खेळीमेळीने व एकोप्याने पार पाडण्यात जे मोलाचे सहकार्य दिले त्याबद्दल संस्थेच्या संचालक मंडळाच्या वतीने आभार मानले आहे.यावेळी संस्थेचे चेअरमन सौ.धनश्री विलास गवस, व्हाईस चेअरमन अनिल शांताराम गवस,सरपंच उमेश शिरोडकर,संस्थेचे संचालक श्री शिवाजी गवस,श्री मारुती गवस,मंथन गवस,श्री चंद्रकांत आईर,श्री जयदेव गवस,श्री दशरथ आईर,श्री ज्ञानेश्वर ठाकुर,सौ. भाग्यश्री खानोलकर,सचिव सुधा परब,सौ.संगीता कोकरे,
वाफोली हितवर्धक संस्था मुंबई अध्यक्ष श्री संतोष गवस,देवस्थान समिती अध्यक्ष श्री विलास गवस,तसेच आजी माजी सभासद उपस्थित होते.
__________________________________
कोकणभूमी ग्रुपला जॉईन होण्यासाठी लिंक
https://chat.whatsapp.com/FQ2fRbfdQI7HyWcNwzm0C6
———————————
बातम्या व जाहिरातसाठी संपर्क
संपादक – शैलेश मयेकर
9404778585,
मदन मुरकर- 9421148673
संजय पिळणकर – 94032 98227
यश माधव- 98199 57223

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!