▪️दीपक केसरकर ;

मृतांच्या कुटुंबीयांच्या दुःखामध्ये आम्ही सहभागी…

II KBC NEWS II
!! kokanbhumi channel !!
🖥️ सावंतवाडी I दि.२७ सप्टेंबर
शहरात भेडले माडाचे झाड कोसळून झालेला प्रसंग अत्यंत दुर्दैवी आहे आम्ही सुद्धा इथले सर्व कार्यक्रम रद्द केले आहेत मृतांच्या कुटुंबीयांच्या दुःखामध्ये आम्ही सहभागी असल्याचे नामदार दीपक केसरकर सांगितले ते पुढे म्हणाले केवळ पैसे मिळाल्याने कुटुंबाचे दुःख दूर होत नाही येत्या दोन दिवसांमध्ये त्यांना शासकीय आणि व्यक्तिगत मदत पोच होईल केवळ पैसे दिल्याने दुःख दूर होत नाही त्या कुटुंबाला दिलासा दिला गेला पाहिजे कारण ही तरुण मुलं आहेत मदत आणि पुनर्वसन विभागाला याबाबत कल्पना दिली जाईल असा विश्वास मंत्री दीपक केसरकर यांनी व्यक्त केला तसेच येणाऱ्या काळामध्ये झाडांच्या धोकादायक फांद्या छाटल्या जातील असे ते म्हणाले आधी या झाडांचा सर्वे केला जाईल शहरामध्ये वीज महावितरणच्या जिवंत लाईन वर झाडे आणि त्याच्या फांद्या आलेले आहेत याची चौकशी करण्याचे आदेश आपण देणार असल्याचे त्यांनी सांगितले
__________________________________
कोकणभूमी ग्रुपला जॉईन होण्यासाठी लिंक
https://chat.whatsapp.com/FQ2fRbfdQI7HyWcNwzm0C6
———————————
बातम्या व जाहिरातसाठी संपर्क
संपादक – शैलेश मयेकर
9404778585,
मदन मुरकर- 9421148673
संजय पिळणकर – 94032 98227
यश माधव- 98199 57223

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!