▪️बंटी माठेकर मित्र मंडळाचा अनोखा उपक्रम…

II KBC NEWS II
|| नाते विश्वासाचे ||
!! kokanbhumi channel !!

🖥️ सावंतवाडी | दि.२८ मार्च
उन्हाळात वन्य प्राणी पाण्याच्या शोधात भर वस्तीत येत असल्याने लोकांच्या जीवाला धोका निर्माण होऊ शकतो. याकरिता बंटी माठेकर मित्र मंडळाच्या माध्यमातून वन विभागाला वारंवार पत्र देऊन देखील वन विभागाने याची अध्यापही दखल घेतली नाही. अखेर या मित्र मंडळाने वन्य प्राण्यांना पाणी मिळावं याकरिता मदारी रोड, सासोलकर मैदान शेजारी कृत्रिम पाण्याची तळी तयार केली आहे.

याकरिता अमित सावंत, संजय नाईक, सचिन सासोलकर, बाळा सोनकर, बंटी माठेकर, प्रसाद जोशी व पाटकर यांनी यासाठी पुढाकार घेऊन वन्य प्राण्यांसाठी पाणी पिण्याची व्यवस्था केली.

अशाच प्रकारे वन विभागामार्फत देखील ठिकठिकाणी कृत्रिम पाण्याची तळी तयार करून वन्य प्राण्यांसाठी पाण्याची व्यवस्था करावी त्याचप्रमाणे भर वस्तीमध्ये वन्य प्राणी येऊ नये याकरिता देखील वन विभागाकडून लवकरात लवकर बंदोबस्त व्हावा अशी मागणी बंटी माठेकर मित्र मंडळाने केली आहे
____________________________________
बातम्या व जाहिरातसाठी संपर्क
संपादक – शैलेश मयेकर
9404778585, 8847701280
____________________________________
👉कोकणभूमी चॅनल (KBC NEWS) च्या व्हाट्सअप चॅनलला जॉईन होण्यासाठी लिंक ला क्लिक करा👈
https://whatsapp.com/channel/0029Va5wSM67j6g0OFP5ud1K
____________________________________

👇कोकणभूमी चॅनल ऑट्सप ग्रुप ला जॉईन व्हा👇
https://chat.whatsapp.com/FQ2fRbfdQI7HyWcNwzm0C6
____________________________________

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!