▪️खंडेराय भवानी प्रासादिक भजन मंडळ कोनाळ आयोजित…

II KBC NEWS II
!! kokanbhumi channel !!
🖥️ दोडामार्ग I दि.०४ सप्टेंबर.
कोनाळ येथील श्री देवी कुलदेवता खंडेराय भवानी मंदिर येथे खंडेराय भवानी प्रासादिक भजन मंडळाच्या वतीने आयोजित केलेल्या जिल्हास्तरीय निमंत्रिताच्या तीन दिवसांच्या स्पर्धेत प्रथम क्रमांकाचे पारितोषिक सांगेली येथील सनामदेव प्रासादिक भजन मंडळाने पटकाविले आहे. या स्पर्धेचे बक्षीस वितरण शिवसेना विधानसभा मतदारसंघ प्रमुख प्रेमानंद देसाई व युवा नेते शैलेश दळवी यांच्या उपस्थितीत करण्यात आले.
तसेच द्वितीय क्रमांक स्वरधारा भजन मंडळ तांबोळी, तृतीय सातेरी पुर्वाचारी भजन मंडळ माटणे, उत्तेजनार्थ स्वरधारा भजन मंडळ मणेरी यांनी पटकाविले. यावेळी वैयक्तिक पारितोषिक तबला जानू शिरवलकर (माटणे), हार्मोनियम वादक प्रेमानंद गवस (खोक्रल), गायक अमीत तांबोळुकर (तांबोळी), झांज रोशन गवस (सांगेली), पखवाज वादक प्रसाद पांगम (सांगेली) यांनी पटकाविले. या स्पर्धेचे परीक्षक म्हणून उदय गवस व अजित दळवी यांनी काम पाहिले.तर विश्वनाथ उर्फ उमेश सावंत यांनी संयोजन केले.
या स्पर्धेत प्रथम पारितोषिक १० हजार रुपये कै. सुलोचना तुकाराम सावंत यांच्या स्मरणार्थ सौ सुचिता सुरेश दळवी ,द्वितीय पारितोषिक ७ हजार रुपये कै फटीराव देसाई यांच्या स्मरणार्थ श्नी.प्रेमानंद देसाई, केर ,तृतीय पारितोषिक ५ हजार रुपये कै जिवाजी लोंढे यांच्या स्मरणार्थ श्नी.प्रेमानंद उर्फ बबन लोंढे तर चतुर्थ पारितोषिक २ हजार रुपये कै गणपत लोंढे यांच्या स्मरणार्थ श्नी.कृष्णा लोंढे यांजकडून ठेवण्यात आले आहेत.
शालेय शिक्षण व मराठी भाषा मंत्री दिपक केसरकर यांच्या माध्यमातून निमंत्रीत सर्व भजन मंडळांना प्रत्येकी एक हजार रुपयांचे मानधन सन्मानचिन्ह व सन्मानपत्र देऊन गौरविण्यात आले.

या स्पर्धेतील सर्व चषके कै दत्ताराम लोंढे यांच्या स्मरणार्थ माजगाव येथील विश्वनाथ उर्फ उमेश सावंत यांनी प्रायोजित केली होती. तरूणांनी एकत्रित येऊन श्री खंडेराय भवानी प्रासादिक भजन मंडळाच्या वतीने स्पर्धा आयोजित केली होती.
या स्पर्धेचा शुभारंभ राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते सुरेश दळवी, राष्ट्रवादी काँग्रेसच्या कोकण महिला अध्यक्षा सौ अर्चना घारे यांच्या हस्ते करण्यात आला होता. तर बक्षीस वितरण शिवसेना विधानसभा मतदारसंघ प्रमुख प्रेमानंद देसाई, युवा नेते शैलेश दळवी यांच्या प्रमुख उपस्थितीत करण्यात आला. यावेळी मानकरी श्रीराम लोंढे, प्रवीण गवस, यशवंत सावंत, संजय गवस, ज्ञानेश्वर सावंत, नाईक दशावतार मंडळाचे अध्यक्ष सागर नाईक, परिक्षक उदय गवस, अजित दळवी,कोनाळ ग्रामस्थ, आयोजक उपस्थित होते.
यावेळी प्रेमानंद देसाई म्हणाले, संगीत, किर्तन भजन अशा भगवंताच्या नामस्मरणातून जीवन पूर्णतृप्त होते. आध्यात्म ज्ञानातून यशाची गुरुकिल्ली मिळते. तर शैलेश दळवी म्हणाले, कोनाळ ग्रामस्थ व तरुणांनी एकत्र येऊन भजन स्पर्धा आयोजित केली पुढच्या वर्षी गोवा राज्यातील भजन मंडळांना निमंत्रित करूया.
यावेळी सुत्रसंचलन उमेश सावंत यांनी केले. __________________________________
कोकणभूमी ग्रुपला जॉईन होण्यासाठी लिंक
https://chat.whatsapp.com/FQ2fRbfdQI7HyWcNwzm0C6
———————————
बातम्या व जाहिरातसाठी संपर्क
संपादक – शैलेश मयेकर
9404778585,
मदन मुरकर- 9421148673
संजय पिळणकर – 94032 98227
यश माधव- 98199 57223

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!