II KBC NEWS II

!! kokanbhumi channel !!
🖥️ सावंतवाडी I दि.२६ ऑगस्ट
इन्सुली येथील बेपत्ता महिला रुक्मिणी नारायण गावडे (वय – ४७,रा.इन्सुलि – गावडेवाडी) यांचा मृतदेह आज शनिवार दि २६ ऑगस्ट रोजी सकाळी तेरेखोल नदीत तुळसाण पुलानजीक आढळून आला.दरम्यान सदर महिला गुरुवार दि २४ ऑगस्ट रोजी संध्याकाळ पासून बेपत्ता होत्या.नातलगांनी त्यांची सर्वत्र शोधाशोध करुनही आढळून न आल्याने शुक्रवार दि २५ ऑगस्ट रोजी सायंकाळी बांदा पोलीसात फिर्याद दाखल केली होती.अखेर आज शनिवारी सकाळी त्यांचा मृतदेह आढळून आला.
बांदा पोलीस उपनिरीक्षक समीर भोसले,काँस्टेबल नाईक,नरेंद्र कुडतरकर आदींसह घटनास्थळी दाखल झाले आहेत.सदर घटनेचा पंचनामा करण्यात आला असून मृतदेह बांदा प्राथमिक आरोग्य केंद्रात शवविच्छेदनासाठी आणण्यात आला आहे.मृतदेह आढळल्याची माहिती समजताच इन्सुली गावातील ग्रामस्थ मोठ्या संख्येने बांदा येथे दाखल झाले आहेत.
___________________________________
कोकणभूमी ग्रुपला जॉईन होण्यासाठी लिंक
https://chat.whatsapp.com/FQ2fRbfdQI7HyWcNwzm0C6
———————————
🏚️बातम्या व जाहिरातसाठी संपर्क
संपादक – शैलेश मयेकर
9404778585,
मदन मुरकर- 9421148673
संजय पिळणकर – 94032 98227
यश माधव- 98199 57223
___________________________________

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!