II KBC NEWS II

!! kokanbhumi channel !!
🖥️ सावंतवाडी I शैलेश मयेकर : दि.१४ ऑगस्ट
आंबोली येथील वर्षा पर्यटन महोत्सवातून पर्यटनाला चालना मिळेल पण त्यासाठी सातत्य ठेवा व पर्यटन महोत्सवातून जनजागृती करा स्थानिकांना विश्वासात घ्या असे आवाहन खासदार विनायक राऊत यांनी केले आहे.ते आंबोली येथील वर्षा पर्यटन महोत्सवाच्या दुसर्‍या दिवशीच्या कार्यक्रमात बोलत होते.
यावेळी आंबोली सरपंच सावित्री पालयेकर,पर्यटन विभागाचे उपसंचालक हनुमंत हेडे,बाबुराव धुरी,रोहिणी गावडे मायकल डिसोझा,रमेश गावकर,बाळू माळकर शब्बीर मणियार,अरूण गावडे आदि यावेळी उपस्थित होते.
खासदार राऊत म्हणाले,महाराष्ट्र पर्यटन विभागामार्फत घेण्यात आलेला उपक्रम स्तुत्य आहे.पण तुम्ही एवढा मोठा कार्यक्रम करता तेव्हा सगळ्यानाच विश्वासात घ्या म्हणजे कार्यक्रम अधिक चांगला होण्यास मदत होणार आंबोली बरोबर गेळे चौकुळ येथेही पर्यटनातील वेगवेगळ्या अशा नैसर्गिक देण आहेत त्याची जपणूक करून देशाच्या नकाशावर आणल्या गेल्या पाहिजेत अशा सूचना ही खासदार राऊत यांनी दिल्या आहेत.तसेच आंबोली ग्रामपंचायत ने स्वतःहून पुढाकार घेत असे उपक्रम राबविण्यास मदत केल्याबद्दल अभिनंदन केले.
सरपंच सावित्री पालयेकर यांनी ही पर्यटन उपक्रम राबविणे गरजेचे आहेत तरच पर्यटन वृध्दीगत होईल असे मत मांडले तसेच सर्वानीच सहकार्य करावे असे आवाहन केले.यावेळी खासदार राऊत यांनी सर्व स्टॉल ना भेटी दिल्या तसेच उपस्थितांशी चर्चा केली.
___________________________________
कोकणभूमी ग्रुपला जॉईन होण्यासाठी लिंक
https://chat.whatsapp.com/FQ2fRbfdQI7HyWcNwzm0C6
———————————
🏚️बातम्या व जाहिरातसाठी संपर्क
संपादक – शैलेश मयेकर
9404778585,
मदन मुरकर- 9421148673
संजय पिळणकर – 94032 98227
यश माधव- 98199 57223
___________________________________

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!