▪️स्वातंत्र्याचा अमृत महोत्सव निमित्त शाळेच्या आवारात नारळ ,सुपारी रोप,मिरवेलं देऊन केलं वृक्षारोपण .

II KBC NEWS II
!! kokanbhumi channel !!
🖥️ मळेवाड I मदन मुरकर : दि.१३ ऑगस्ट
सध्या स्वातंत्र्याचा अमृत महोत्सव निमीत्त सगळीकडे वेगवेगळे उपक्रम राबविले जात आहेत. अशातच
आरोस पंचक्रोशी विद्या विकास हायस्कूल ची विद्यार्थिनी कु.प्राची मदन मुरकर हिने सुद्धा स्वातंत्र्याचा अमृत महोत्सव निमित्ताने आपल्या आरोस येथील विद्या विकास हायस्कूल ला नारळ रोप, सुपारी रोप,मिरवेल अशी झाडं देऊन एक प्रकारे झाडे लावा झाडे जगवा आसा संदेश दिला आहे.
आपल्या शाळेतील शिक्षक व विद्यार्थी समवेत वृक्षा रोपण करून या उपक्रमाचा आनंद घेतला आहे.
प्राची ने या उपक्रमांतर्गत शाळेच्या आवारात वृक्षारोपण करून एक आदर्श निर्माण केला आहे अशी प्रतिक्रिया प्रशालेचे मुख्याध्यापक श्री विद्याधर देसाई यांनी दिली.तिच्या या उपक्रमाबद्धल संस्था उपाध्यक्ष श्री निलेश परब यांनी कौतुक केले.
यावेळी प्रशाळेचे मुख्याध्यापक श्री विद्याधर देसाई,सदस्य अर्जुन मुळीक, शिक्षक एल.सावंत, श्री तानाजी वरक,श्री अनिल नाईक,सौ.देवयानी चव्हाण, सौ.श्रद्धा परब,नाईक मॅडम शिक्षकेत्तर कर्मचारी तानाजी खोत,शाळेचे विद्यार्थी , कर्मचारी आदी उपस्थित होते.
___________________________________
कोकणभूमी ग्रुपला जॉईन होण्यासाठी लिंक
https://chat.whatsapp.com/FQ2fRbfdQI7HyWcNwzm0C6
———————————
🏚️बातम्या व जाहिरातसाठी संपर्क
संपादक – शैलेश मयेकर
9404778585,
मदन मुरकर- 9421148673
संजय पिळणकर – 94032 98227
यश माधव- 98199 57223
___________________________________

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!