II KBC NEWS II

!! kokanbhumi channel !!
🖥️ वेंगुर्ला I संजय पिळणकर : दि.३० जुलै
कुडाळ : मुंबई गोवा महामार्गावरील पिंगुळी गुढीपूर दरम्यान सायकलने रस्ता क्रॉस करत असताना मुंबईच्या दिशेने जाणाऱ्या स्विफ्ट कारने १० वर्षाच्या कु.विराज तेली या मुलाला उडवले. यात मुलाचा जागीच मृत्यू झाला आहे. ही घटना आज रविवारी सकाळी ७-३० वाजण्याच्या सुमारास घडली आहे.
मारूती स्विफ्ट कारचा गाडी नंबर एम.एच.०७ ए.बी.०११५ ही दोडामार्ग येथील राजेश गवस यांची आहे.ते सिंधुदुर्ग जिल्हा मुख्यालय येथे पोलिस आहेत.ते ड्युटीवर जात असताना हा अपघात घडला आहे.कु विराज हा बिबवणे येथील लक्ष्मी नारायण विद्यालयामध्ये इयत्ता ५ वी मध्ये शिक्षण घेत होता.
सविस्तर वृत्त असे की,कु.विराज निलेश तेली राहणार पिंगुळी – गुढीपूर येथील हा मुलगा सकाळी ७-३० च्या दरम्याने आपल्या सायकलने हायवेवरून जात असताना स्विफ्ट कारच्या जोरदार धडकेत जाग्यावरच गतप्राण झाला.
विराजचे वडील निलेश सत्यवान तेली हे आपल्या पत्नीसह गेली १५ वर्षे कुडाळ गुढीपूर येथे राहतात.ते मुळचे कणकवली येथील बोर्डवे तेलीवाडी येथील आहेत.त्यांना ४ वर्षाचा आणखी एक छोटा कु.वेद हा मुलगा आहे.तर विराज हा त्यांचा १० वर्षाचा मोठा मुलगा होता.
बिबवणे पंचक्रोशी शिक्षण मंडळ,विद्यालय व पंचक्रोशीवर कु. विराज याच्या अपघाती निधनाने शोककळा पसरली आहे.
___________________________________
कोकणभूमी ग्रुपला जॉईन होण्यासाठी लिंक
https://chat.whatsapp.com/FQ2fRbfdQI7HyWcNwzm0C6
———————————
🏚️बातम्या व जाहिरातसाठी संपर्क
संपादक – शैलेश मयेकर
9404778585,
मदन मुरकर- 9421148673
संजय पिळणकर – 94032 98227
यश माधव- 98199 57223
___________________________________

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!