II KBC NEWS II

kokanbhumi
🖥️ सातार्डा | प्रतिनिधी :दि.३१ मे
सातार्डा येथील ग्रामपंचायत कार्यालय व लोकमान्य मल्टीपर्पज को ऑप सोसायटी लिमिटेड, शाखा – बांदा तसेच ऑप्टिक्स मार्ट ऑप्टिकल्स, बांदा यांच्या संयुक्त विद्यमाने सातार्डा ग्रामपंचायत कार्यालयामध्ये आयोजित केलेल्या मोफत नेत्र तपासणी शिबिराचा १०७ जणांनी लाभ घेतला. या शिबिराचे उदघाटन सरपंच संदीप उर्फ बाळू प्रभू यांच्याहस्ते दीपप्रज्वलनाने करण्यात आले.
यावेळी उपसरपंच उत्कर्षां पेडणेकर, ग्रामपंचायत सदस्य मिलिंद जाधव, गोविंद मांजरेकर,माजी सरपंच उदय पारीपत्ये, तंटामुक्त समितीचे अध्यक्ष चंद्रशेखर प्रभू, विकास सोसायटीचे चेअरमन मनोहर मेस्त्री, पोलीस पाटील विनिता मयेकर, लोकमान्य सोसायटीच्या बांदा शाखेचे अकाउंटंट सर्वेश प्रभू, ग्रामसेवक एस एल राऊळ,ऑप्टिक्स मार्टचे निखिल कुडव, ग्रामपंचायत लिपिक अशोक जाधव उपस्थित होते.
नेत्र तपासणी शिबिराचा १०७ जणांनी लाभ घेतला. या शिबिरामध्ये संगणकाद्वारे मोफत मोतीबिंदू तपासणी करण्यात आली. नेत्र तपासणी नंतर अल्प दरात चष्मे वाटप करण्यात आली. नेत्र चिकित्सक साईनाथ काणेकर,ज्ञानेश्वर येडवे यांनी शिबिरामध्ये सहभाग घेतलेल्या रुग्णांची नेत्र तपासणी केली. नेत्र तपासणी शिबिर व लोकमता अहिल्याबाई होळकर यांच्या जयंतीचे औचित्य साधून माजी सरपंच राधिका कृष्णा गोवेकर, सामाजिक कार्यकर्त्यां स्नेहा सगुण पारीपत्ये यांच्या सामाजिक तळमळीची दख्खल घेऊन पुण्यश्लोक अहिल्याबाई होळकर महिला सन्मान पुरस्काराने सरपंच बाळू प्रभू यांच्याहस्ते शाल, श्रीफळ व प्रशस्तीपत्रक देऊन गौरविण्यात आले.
___________________________________
कोकणभूमी ग्रुपला जॉईन होण्यासाठी लिंक
https://chat.whatsapp.com/FQ2fRbfdQI7HyWcNwzm0C6
———————————
*🏚️बातम्या व जाहिरातसाठी संपर्क
संपादक – शैलेश मयेकर
9404778585,
मदन मुरकर- 9421148673
संजय पिळणकर – 94032 98227
यश माधव- 98199 57223
➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!