▪️सिंधुरक्तमित्र प्रतिष्ठान सिंधुदुर्गचे सहकार्य…

II KBC NEWS II
|| नाते विश्वासाचे ||
!! kokanbhumi channel !!

🖥️ सावंतवाडी | दि.०३ एप्रिल
श्री देवी माऊली सांस्कृतिक उत्कर्ष मंडळ रोणापाल आयोजित रक्तदान शिबिरास ३० रक्तदात्यांनी सहभाग घेतला.हे रक्तदान शिबिर मंडळाचे अध्यक्ष प्रकाश गावडे यांच्या वाढदिवसानिमित्त सलग दुसऱ्या वर्षी घेण्यात आले.
शिबिराचे उद्घाटन प्रकाश गावडे,डॉ मयुरेश पटवर्धन,सिंधुरक्तमित्र प्रतिष्ठान सिंधुदुर्गचे जीएमसी गोवा ब्लड बँक समन्वयक संजय पिळणकर,राजन परब,मडूरा माजी सरपंच उल्हास परब,सचिव विष्णू सावंत,ग्रा पं सदस्य नंदकिशोर नेमण,माजी तंटामुक्त अध्यक्ष बाबल तुयेकर,डॉ सागर जाधव यांच्या प्रमुख उपस्थितीत
दीपप्रज्वलनाने करण्यात आले.या रक्तदान शिबिरासाठी सिंधुरक्तमित्र प्रतिष्ठान व सावंतवाडी रक्तपेढीचे बहुमोल सहकार्य लाभले.

यावेळी संजय पिळणकर यांनी रक्तदानाबाबत मार्गदर्शन करून मंडळाचे कौतुक केले.तसेच उल्हास परब,प्रकाश गावडे,डॉ पटवर्धन यांनीही मनोगत व्यक्त केले.
या कार्यक्रमाचे सूत्रसंचालन मंगेश गावडे यांनी तर प्रास्ताविक सुदिन गावडे यांनी केले,उदय गावडे यांनी आभार मानले.
____________________________________
बातम्या व जाहिरातसाठी संपर्क
संपादक – शैलेश मयेकर
9404778585, 8847701280
____________________________________
👉कोकणभूमी चॅनल (KBC NEWS) च्या व्हाट्सअप चॅनलला जॉईन होण्यासाठी लिंक ला क्लिक करा👈
https://whatsapp.com/channel/0029Va5wSM67j6g0OFP5ud1K
____________________________________

👇कोकणभूमी चॅनल ऑट्सप ग्रुप ला जॉईन व्हा👇
https://chat.whatsapp.com/FQ2fRbfdQI7HyWcNwzm0C6
____________________________________

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!