• II KBC NEWS II
    kokanbhumi
    🖥️ सातार्डा | प्रतिनिधी :दि.३० मे
    सातार्डा – मळेवाड रस्त्यावर मेसवाडी येथे रस्त्याच्या बाजूला बसलेल्या गायीला अज्ञात वाहनाने चिरडल्याने गाय जागीच मृत्यूमुखी पडली. सोमवारी पहाटे सहा वाजताच्या दरम्यान ही दुर्घटना घडली. मेसवाडी येथील दीपक वेंगुर्लेकर यांच्या मालकीची ती गाय होती. रस्त्याच्या बाजूला बसलेल्या गायीला अज्ञात वाहनाने जोरदार धडक दिल्याने गायीच्या मानेच्या भागाचा चेंदामेंदा झाला.गाय जागीच मृत्युमुखी पडल्यानंतर अज्ञात वाहन चालकाने पळ काढला.रस्त्यावर गायीच्या रक्ताचा सडा पडला होता. ग्रामस्थांनी गायीचा मृतदेह बाजूला करून मृतदेहाची विल्हेवाट लावली.
    ___________________________________
    कोकणभूमी ग्रुपला जॉईन होण्यासाठी लिंक
    https://chat.whatsapp.com/FQ2fRbfdQI7HyWcNwzm0C6
    ———————————
    *🏚️बातम्या व जाहिरातसाठी संपर्क
    संपादक – शैलेश मयेकर
    9404778585,
    मदन मुरकर- 9421148673
    संजय पिळणकर – 94032 98227
    यश माधव- 98199 57223
    ➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!