▪️शासनाकडून होणारा औषध पुरवठा ८० टक्के कमी…साधं टि टी च इंजेक्शन सुद्धा बाहेरून लिहून द्याव लागत!खळबळ जनक माहिती…
II KBC NEWS II
kokanbhumi

🖥️दोडामार्ग | प्रतिनिधी :दि.२४ मार्च
सामाजिक बांधिलकीच्या वतीने रवी जाधव जीवन रक्षा वैद्यकीय प्रतिष्ठानचे अध्यक्ष राजू मसुरकर व युवा रक्तसंघटनेचे अध्यक्ष देव्या सूर्याजी यांनी आज दिनांक २४ मार्च २०२३ रोजी उपजिल्हा रुग्णालयामध्ये जाऊन रुग्णांना देण्यात येणाऱ्या औषधांच्या तुटवड्याबाबत डॉक्टर यांच्याशी चर्चा केली. असता मिळालेल्या माहितीनुसार औषधांच्या तुतड्याबाबत मोठी खंत व्यक्त केली आहे. पेशंटला बाहेरची औषधे लिहून द्यायला आमचा नाविलाज असल्याची खंत येथील डॉक्टरांनी व्यक्त केली आहे.

यावेळी मिळालेल्या माहितीनुसार साधं टि टी च इंजेक्शन सुद्धा डॉक्टर बाहेरून लिहून देत असल्याची खळबळजनक माहिती मिळाली आहे.जिल्हा रुग्णालयाबरोबरच सर्वच उपजिल्हा रुग्णालयांमध्ये शासनाकडून होणारा औषध पुरवठा ८० टक्के कमी आहे याबाबत आम्ही दर आठ दिवसांनी औषधांचा पुरवठा होण्याबाबत पाठपुरावा करत असतो परंतु महाराष्ट्र शासनाकडून पाहिजे तसा औषध पुरवठा होत नसल्याने नाईलाजाने रुग्णांना बाहेरची औषधे लिहून द्यावी लागतात स्टेप्टोगायनेस हे हार्ट अटॅक वरील इंजेक्शन आहे अशा प्रकारच्या दहा ते बारा इंजेक्शनचा पुरवठा नसल्यामुळे संबंधित रुग्णांना गोवा बांबुळी किंवा प्रायव्हेट हॉस्पिटलमध्ये पाठवावे जातात. उपस्थित सामाजिक कार्यकर्त्यांना डॉक्टर  यांनी विनंती करून याबाबत आपल्याला काय करता येईल यासाठी सहकार्य करा जेणेकरून गोरगरिबांना त्याचा लाभ मिळू शकेल. त्यावेळी देव्या सूर्याजी यांनी मा. शिक्षण मंत्री दीपक केसरकर यांच्याशी डॉक्टर वजरकर यांच फोनवर बोलणं करून दिल असता मा. दीपक भाई केसरकर म्हणाले की माझं आत्ताच या विषयासंदर्भात कलेक्टरशी बोलणं झालेले आहे यासंदर्भात जेवढी औषधे लागणार त्या निधीसाठी औषधांची लिस्ट आपण सिव्हिल सर्जन कडून मागून घेतलेली आहे असे ते या वेळी म्हणाले परंतु त्यासाठी लागणारा निधी आमदार फंडातून आपण उपलब्ध करून देऊ असे ही श्री केसरकर यानी डॉक्टर वज्राटकर सरांना आश्वासन दिले आहे. त्यासाठी डॉ.वज्राटकर व उपस्थित सामाजिक कार्यकर्त्यांनी त्यांचे आभार मानले आहेत.
___________________________________
कोकणभूमी ग्रुपला जॉईन होण्यासाठी लिंक
https://chat.whatsapp.com/FQ2fRbfdQI7HyWcNwzm0C6
————————————
🏚️बातम्या व जाहिरातसाठी संपर्क
संपादक – शैलेश मयेकर
9404778585,
मदन मुरकर- 9421148673
संजय पिळणकर – 94032 98227
यश माधव- 98199 57223
➖➖➖➖➖➖➖➖

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!