II KBC NEWS II

!! kokanbhumi channel !
🖥️ वेंगुर्ला I संजय पिळणकर : दि.२४ जुलै
शहरातील सेंटलुक्स हॉस्पीटलच्या कंम्पाउंड मधील विहीरीमध्ये रविवार दि २३ जुलै रोजी रात्री १२.३० वाजण्याच्या सुमारास एका युवकाचा मृतदेह आढळून आला आहे.साईश सुरेश वेंगुर्लेकर (वय ३१) वर्षे असे त्याचे नाव आहे.त्याने आत्महत्या केली असल्याचा प्राथमिक अंदाज व्यक्त करण्यात येत आहे. सेंटलुक्स हॉस्पीटल कंम्पाउंड मध्ये साईश याचे घर आहे.घराच्या बाजूला असलेल्या विहिरीमध्ये मध्यरात्री त्याचा मृतदेह दिसून आला.साईश याचे मानसिक संतुलन बिघडलेले होते. दरम्यान कमलाकर आपा वेंगुर्लेकर यांनी वेंगुर्ले पोलीस ठाण्यात दिलेल्या माहितीनुसार पोलिसांनी आकस्मिक मृत्यू म्हणून नोंद केली आहे.या प्रकरणाचा अधिक तपास पो. उपनिरीक्षक तुकाराम जाधव आणि पो.हवालदार चव्हाण करीत आहेत.
___________________________________
कोकणभूमी ग्रुपला जॉईन होण्यासाठी लिंक
https://chat.whatsapp.com/FQ2fRbfdQI7HyWcNwzm0C6
———————————
बातम्या व जाहिरातसाठी संपर्क
संपादक – शैलेश मयेकर
9404778585,
मदन मुरकर- 9421148673
संजय पिळ

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!