II KBC NEWS II

kokanbhumi
🖥️ सावंतवाडी | प्रतिनिधी :दि.०५ जून
मळेवाड – भटवाडी परिसरात मुख्य रस्त्याच्या बाजूला अज्ञात इसमाचा मृतदेह आढळला आहे.सदर ईसमाची ओळख पटलेली नसून त्याच्या अंगावर जांभळ्या रंगाचा शर्ट आहे.
याबाबत सविस्तर माहिती अशी की,मळेवाड उपसरपंच हेमंत मराठे यांनी मळेवाड – भटवाडी येथे अज्ञात इसमाचा मृतदेह रस्त्याच्या बाजूला असल्याचे आरोंदा पोलिस दुरक्षेत्राला सकाळी ९.०० च्या दरम्यान फोन करून माहिती दिली असता हवालदार बाबुराव जाधव हे सावंतवाडी पोलीस ठाण्याचे पोलिस उपनिरीक्षक सुरज पाटील व होमगार्ड दिनेश बरागडे यांच्यासह घटनास्थळी दाखल झाले.
यावेळी त्यांनी घटनास्थळाचा पंचनामा करून शवविच्छेदनासाठी मृतदेह मळेवाड प्राथमिक आरोग्य केंद्रात नेला.अधिक तपास पोलीस उपनिरीक्षक पाटील करत आहेत
___________________________________
कोकणभूमी ग्रुपला जॉईन होण्यासाठी लिंक
https://chat.whatsapp.com/FQ2fRbfdQI7HyWcNwzm0C6
———————————
*🏚️बातम्या व जाहिरातसाठी संपर्क
संपादक – शैलेश मयेकर
9404778585,
मदन मुरकर- 9421148673
संजय पिळणकर – 94032 98227
यश माधव- 98199 57223
➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!