*_आगामी ग्रामसभेत पोटसमित्या करण्यात येणार स्थापन…_*

*ll KONKANBHUMI ll*
(KBC News)
*_🖥️ सातार्डा | प्रतिनिधी :दि.३१_*
सातार्डा पंचायत समिती मतदार  संघातील प्रजासत्ताक दिनी दि २६ जानेवारीला आयोजित करण्यात आलेल्या सातार्डा, सातोसे, कास, कवठणी, किनळे ग्रामपंचायतच्या ग्रामसभा कोरम अभावी तहकुब झाल्या आहेत. आगामी ग्रामसभांमध्ये ग्रामपंचायतमार्फत निवडल्या जाणाऱ्या पोटसमित्यांमध्ये अनेक राजकीय, सामाजिक कार्यकर्त्यांना तसेच तरुणांना गावाच्या विकासासाठी काम करण्याची संधी मिळणार आहे.
ग्रामपंचायत निवडणुकीमध्ये सातार्डा, कवठणी, किनळे, कास गावांमध्ये अनुभवी राजकीय कार्यकर्त्यांसमवेत अनेक तरुण उमेदवार निवडणूक रिंगणात होते. ग्रामपंचायत मार्फत निवडल्या जाणाऱ्या पोटसमित्यांवर राजकीय, सामाजिक कार्यकर्ते व तरुणांना गावाच्या विकासासाठी काम करण्याची संधी उपलब्ध होणार आहे.
कोकण विभागाच्या शिक्षक मतदार संघाची निवडणूक असल्याने दि ४ फेब्रुवारीपर्यंत आचार संहिता आहे. आगामी ग्रामसभेत पोटसमित्या स्थापन करण्यात येणार आहेत. त्यामध्ये ग्रामविकास समिती, ग्रामआरोग्य पोषण पाणी पुरवठा, पोषण आहार व स्वच्छता समिती, सामाजिक अंकेक्षण समिती, सामाजिक लेखा परीक्षण समिती, ग्रामबाल संरक्षण समिती, जैवविविधता समिती आदींचा समावेश आहे. या समित्यांवर पदसिद्ध पदाधिकारी,अनुसूचित जाती सदस्यांचा प्रामुख्याने समावेश असणार आहे.पोटसमित्याच्यां अध्यक्षस्थानी सरपंच असणार आहेत.

______________________
*कोकणभूमी ग्रुपला जॉईन होण्यासाठी लिंक*
https://chat.whatsapp.com/FQ2fRbfdQI7HyWcNwzm0C6
————————————
*🏚️बातम्या व जाहिरातसाठी संपर्क*
*शैलेश मयेकर*
*📲9404778585*
*मदन मुरकर,*
*📲9421148673*
➖➖➖➖➖➖➖➖*

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!