*_आरोस विद्यालयाचा एलिमेंटरी व इंटरमिजिएट ग्रेड परीक्षेचा निकाल १०० टक्के.._*

*ll KONKANBHUMI ll*
(KBC News)
*_🖥️ मळेवाड | मदन मुरकर :दि.३१_*
आरोस येथील विद्या विहार इंग्लिश स्कूल व कनिष्ठ महाविद्यालय, आरोस विद्यालयाचा एलिमेंटरी व इंटरमिजिएट ग्रेड परीक्षेचा निकाल १०० टक्के लागला. एलिमेंटरी परीक्षेस २४ विद्यार्थी प्रविष्ठ झाले होते. आर्यन हरिजन, धनश्री मोरजकर, बबली नाईक, श्रेया नाईक, प्राची सावंत, जान्हवी शिरोडकर यांनी ‘ए’ श्रेणी प्राप्त केली. मयुरी आरोसकर, समरिना हरिजन, बाळकृष्ण मोरजकर, हर्षदा नाईक, उत्कर्षा नाईक, प्राची पडते, रितिका पालयेकर, गौरी परब, महादेव परब, रामचंद्र परब, स्नेहल परब, महादेव सावळ यांनी ‘बी’ श्रेणी प्राप्त केली. उर्वरित विद्यार्थ्यांनी ‘सी’ श्रेणी प्राप्त केली. इंटरमिजिएट परीक्षेस १९ विद्यार्थी प्रविष्ठ झाले होते. साहिल बर्डे, भूमिका मयेकर, श्वेता मडुरकर, अंकिता मोरजकर, अपूर्वा नाईक, तेजल परब, लावण्या पिंगुळकर, संजना पटेकर, यांनी ‘ए’ श्रेणी प्राप्त केली. अर्पिता गावडे, गौरी मेस्त्री, रितिका पालयेकर, मोहन परब, साबाजी परब, यश परब यांनी ‘बी’ श्रेणी प्राप्त केली. उर्वरित विद्यार्थ्यांनी ‘सी’ श्रेणी प्राप्त केली.
या सर्व विद्यार्थ्यांचे व मार्गदर्शक शिक्षक विवेकानंद सावंत यांचे संस्था अध्यक्ष निलेश परब, संस्था सदस्य, शालेय समिती अध्यक्ष हेमंत कामत, पालक शिक्षक संघ उपाध्यक्ष संतोष पिंगुळकर, प्रशालेचे मुख्याध्यापक सदाशिव धुपकर तसेच शिक्षक, शिक्षकेतर कर्मचारी यांनी अभिनंदन केले.

______________________
*कोकणभूमी ग्रुपला जॉईन होण्यासाठी लिंक*
https://chat.whatsapp.com/FQ2fRbfdQI7HyWcNwzm0C6
————————————
*🏚️बातम्या व जाहिरातसाठी संपर्क*
*संपादक – शैलेश मयेकर*
*📲9404778585*
*मदन मुरकर,*
*📲9421148673*
➖➖➖➖➖➖➖➖*

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!