*ll KONKANBHUMI ll*
(KBC News)
*_🖥️ सावंतवाडी | प्रतिनिधी :दि.३१_*
स्वच्छ सुंदर शाळा पुरस्कार प्राप्त, ISO मानांकित जिल्हा परिषद पूर्ण प्राथमिक शाळा सावंतवाडी नं ४ ला नुकतीच युनिसेफ महाराष्ट्रच्या श्रीम.मैथिली गुप्ते मॅडम यांनी सदिच्छा भेट दिली.सोबत समग्र शिक्षा अभियान सिंधुदुर्ग च्या APO श्रीम.स्मिता नलावडे ,केंद्र प्रमुख श्रीम.स्नेहा लंगवे ,समग्र शिक्षा सावंतवाडीचे पिंगुळकर सर आणि शाळा व्यवस्थापन समितीचे अध्यक्ष संतोष तळवणेकर उपस्थित होते.
यावेळी मैथिली मॅडमनी इयत्ता पाचवी,सहावी व सातवीच्या विद्यार्थ्यांशी हितगुज केली. विद्यार्थ्यांनी सुद्धा खूप सुंदर प्रकारे प्रतिसाद दिला.मॅडमनी केशव जाधव यांजकडून शाळेच्या विविध उपक्रमांची विस्तृत माहिती करून घेतली.शाळेचा अद्ययावत संगणक कक्ष,सुंदर प्रयोगशाळा,भव्य प्रवेशद्वार आणि सुंदर परिसर न्याहाळताना खूप प्रसन्न होऊन गेल्यात.शाळेच्या विद्यार्थ्यांची गुणवत्ता,स्वच्छ व सुंदर शाळा आणि उपक्रमशील शिक्षकांची मेहनत पाहून श्रीम. गुप्ते यांनी आनंद व्यक्त केला आणि जिल्ह्यातील एक सर्वसोयींनी युक्त अशी आदर्श शाळा पहायला मिळाली असे गौरवोद्गारही काढले.
यावेळी शाळेचे मुख्याध्यापक पावरा सर,श्रीमती कविता धुरी ,श्रीमती प्रणिती सावंत ,अमर पाटील ,श्रीम.सुजाता पवार  आणि कामगिरी शिक्षिका श्रीम.बागवे आदी शिक्षक उपस्थित होत्या.यावेळी केशव जाधव सरांनी उपस्थित मान्यवरांचे आभार व्यक्त केले.

______________________
*कोकणभूमी ग्रुपला जॉईन होण्यासाठी लिंक*
https://chat.whatsapp.com/FQ2fRbfdQI7HyWcNwzm0C6
————————————
*🏚️बातम्या व जाहिरातसाठी संपर्क*
*संपादक – शैलेश मयेकर*
*📲9404778585*
*मदन मुरकर,*
*📲9421148673*
➖➖➖➖➖➖➖➖*

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!