*_….विद्यार्थ्यांना बक्षीस वितरण आणि हळदी कुंकू कार्यक्रम मान्यवरांच्या उपस्थितीत संपन्न_*

*ll KONKANBHUMI ll*
(KBC News)
*_🖥️ बांदा | प्रतिनिधी :दि.३१._*
प्रजासत्ताक दिनाचे औचित्य साधून जि. प. प्रा. शाळा सातोसे दुर्ग नं. ३ प्रशालेत प्रतिवर्षी प्रमाणे वार्षिक स्नेहसंमेलन, बक्षीस वितरण आणि हळदी कुंकू कार्यक्रम मान्यवरांच्या उपस्थितीत मोठ्या उत्साहात संपन्न झाला.
यावेळी सातोसे सरपंच प्रतीक्षा मांजरेकर, सातार्डा माजी सरपंच भरत मयेकर, सातोसे पोलीस पाटील संदीप सातार्डेकर, शाळा व्यवस्थापन समिती अध्यक्ष अमेय सातार्डेकर, उपाध्यक्ष श्यामसुंदर मयेकर, सातोसे माजी उपसरपंच पूजा मांजरेकर, गोवा वाहतूक पोलीस विजय गडेकर, शा. व्य. समिती माजी अध्यक्ष सूर्यकांत गडेकर, सातोसे माजी ग्रामपंचायत सदस्य उत्तम शिरोडकर, तसेच प्रकाश मयेकर, प्रसाद मांजरेकर, ज्येष्ठ नागरिक मोहन गडेकर, सातार्डा अंगणवाडी सेविका शालीनी रावळ व मानसी मयेकर आदि मान्यवर उपस्थित होते.
पूर्व माध्यमिक शिष्यवृत्ती परीक्षेत तालुक्यात सहावी आलेली माजी विद्यार्थीनी श्रावणी गडेकर हिचा सत्कार करण्यात आला. शालेय, केंद्र व प्रभागस्तरावर नैपुण्य मिळविलेल्या सर्व विद्यार्थ्यांना मान्यवरांच्या हस्ते बक्षीस वितरण करण्यात आले. सदर बक्षिसे अध्यक्ष अमेय सातार्डेकर यांनी पुरस्कृत केली. सरपंच मांजरेकर यांनी आपल्या मनोगतामध्ये शाळा व  विद्यार्थ्यांच्या प्रगतीविषयी समाधान व्यक्त केले. तसेच सातार्डा व सातोसे गावातील ग्रामस्थांनी शाळेसाठी केलेल्या सहकार्याबद्दल समाधान व्यक्त करून मुख्याध्यापक अमित पिळणकर व उपशिक्षक ओमनाथ क्षीरसागर यांच्या कार्याबद्दल कौतुक केले. त्यानंतर सातार्डा अंगणवाडीच्या मुलांनी, आजी व माजी सर्व विद्यार्थ्यांचे विविध गुणदर्शन कार्यक्रम झाले. नंतर महिलांचा हळदी कुंकू समारंभ झाला. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन ओमनाथ क्षीरसागर यांनी तर अमित पिळणकर यांनी प्रास्ताविक करून श्रमदान, वस्तूरूपात व आर्थिक स्वरूपात ज्या दात्यांनी यथाशक्ती सहकार्य केलेल्यांचे आभार मानले.

______________________
*कोकणभूमी ग्रुपला जॉईन होण्यासाठी लिंक*
https://chat.whatsapp.com/FQ2fRbfdQI7HyWcNwzm0C6
————————————
*🏚️बातम्या व जाहिरातसाठी संपर्क*
*संपादक : शैलेश मयेकर*
*📲9404778585*
*मदन मुरकर,*
*📲9421148673*
➖➖➖➖➖➖➖➖*

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!