*ll KONKANBHUMI ll*
(KBC News)
*_🖥️ सावंतवाडी | प्रतिनिधी :दि.३०_*
सावंतवाडी शहरात चोऱ्यांचे प्रमाण वाढले असून चोरट्याना पोलिसांचा भय राहिला नाही तसेच पोलिसांच्या कामात दिरंगाई होत असल्याचे दिसून येत आहे. या संदर्भात उद्या ३१ जानेवारी रोजी माजी नगराध्यक्ष बबन साळगावकर व शहरातील विविध संघटना पोलीस निरीक्षकांची भेट घेणार आहेत.
सावंतवाडी शहर तसेच सावंतवाडी तालुका बीट क्षेत्रामध्ये गेल्या वर्षभरात अनेक ठिकाणी चोऱ्या झालेल्या आहेत. नागरिकांच्या मालमत्ताचे नुकसान झालेलं आहे. त्यांच प्रमाणे सोनुर्ली येथील श्रीदेवी माऊली मंदिरातील देवीच्या प्रभावळ चोरीचा तपास अजून तगायत लागला नाही त्यातच आता शहरांमध्ये भर दुपारी वस्तीमध्ये वृद्ध महिलेची मंगळसूत्राची चोरी  करण्याची हिम्मत चोरट्यांना होते हे पोलीस प्रशासनाचे अपयश असून. चोरट्याना पोलिसांचा भय राहिला नाही काय असा प्रश्न निर्माण होतो असे श्री साळगावकर यांनी दिलेल्या प्रसिद्धी पत्रकात म्हटले आहे.
या चोरट्यांना  तात्काळ जेर बंद करून तालुक्यात होणाऱ्या चोऱ्या थांबवाव्यात यासंदर्भात उद्या ३१ जानेवारी रोजी सकाळी अकरा वाजता सावंतवाडी पोलीस स्टेशनवर श्री साळगावकर यांच्या नेतृत्वाखाली दहा जणांच शिष्टमंडळ पोलीस निरीक्षकांची भेट घेणार असल्याचे त्यांनी सांगितले

______________________
*कोकणभूमी ग्रुपला जॉईन होण्यासाठी लिंक*
https://chat.whatsapp.com/FQ2fRbfdQI7HyWcNwzm0C6
————————————
*🏚️बातम्या व जाहिरातसाठी संपर्क*
*संपादक – शैलेश मयेकर*
*📲9404778585*
*मदन मुरकर,*
*📲9421148673*
➖➖➖➖➖➖➖➖*

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!