▪️ भव्य टेनिस बॉल क्रिकेट स्पर्धेचा आज अॅड. अनिल निरवडेकर यांच्या हस्ते शुभारंभ…

II KBC NEWS II
|| नाते विश्वासाचे ||
!! kokanbhumi channel !!

🖥️ सावंतवाडी | दि.२९ मार्च
जयप्रकाश चौक मित्र मंडळ आणि बाबू सावंत मित्र मंडळ आयोजित भव्य टेनिस बॉल क्रिकेट स्पर्धेचा आज सावंतवाडी जिमखाना मैदान येथे अॅडव्होकेट अनिल निरवडेकर यांच्या हस्ते शुभारंभ करण्यात आला.

यावेळी गुरुप्रसाद पेडणेकर, विल्फ्राईड फर्नांडिस, बाबू सावंत, दीपेश शिंदे, महेश डोंगरे, निरंजन देसाई, फोंडेकर, बाबलो तळवणेकर आदी उपस्थित होते.

२९ व ३० मार्च २०२४ रोजी खेळल्या जाणाऱ्या या भव्य टेनिस बॉल क्रिकेट स्पर्धेचे प्रथम पारितोषिक ५०,०२४ व चषक तर द्वितीय पारितोषिक २५०२४ व चषक ठेवण्यात आले आहे.

दरम्यान जयप्रकाश चौक मित्र मंडळ आणि बाबू सावंत मित्र मंडळ यांच्यावतीने गेल्या पंचवीस वर्षे क्रिकेट क्षेत्रात अविरत काम करणारे, तसेच सर्वसामान्यांच्या मदतीला धावून जाणारे जिमखाना मित्र मंडळाचे अध्यक्ष अजित सांगेलकर तथा उद्धव बाळासाहेब ठाकरे शिवसेना सावंतवाडी ग्राहक मंच शहर प्रमुख यांचे शाल व सन्मानचिन्ह देऊन सन्मान करण्यात आला.

यावेळी बाबू सावंत, गुरु पेडणेकर, बाबा अलमेडा, अमोल शितोळे, राकेश पवार, परेश बावकर, गुरुचिटणीस, अमोल केसरकर आदी मंडळाचे कार्यकर्ते उपस्थित होते.
____________________________________
बातम्या व जाहिरातसाठी संपर्क
संपादक – शैलेश मयेकर
9404778585, 8847701280
____________________________________
👉कोकणभूमी चॅनल (KBC NEWS) च्या व्हाट्सअप चॅनलला जॉईन होण्यासाठी लिंक ला क्लिक करा👈
https://whatsapp.com/channel/0029Va5wSM67j6g0OFP5ud1K
____________________________________

👇कोकणभूमी चॅनल ऑट्सप ग्रुप ला जॉईन व्हा👇
https://chat.whatsapp.com/FQ2fRbfdQI7HyWcNwzm0C6
____________________________________

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!