1.  

    ▪️प्रा. रूपेश पाटील यांचे शिवचरित्र व्याख्यान, राजे प्रतिष्ठानचे आयोजन…

    II KBC NEWS II
    || नाते विश्वासाचे ||
    !! kokanbhumi channel !!

    🖥️ आंबोली | दि.२७ मार्च
    सावंतवाडी तालुक्यातील आंबोली येथील राजे प्रतिष्ठान, कामतवाडी यांच्या वतीने तिथीनुसार शिवजन्मोत्सव सोहळा २७ आणि २८ मार्चदरम्यान साजरा करण्यात येणार आहे. यानिमित्त छत्रपती शिवाजी महाराज चौक, कामतवाडी-आंबोली येथे येथे विविध कार्यक्रमांचे आयोजन केले आहे. बुधवारी (ता. २७) सकाळी ९ वाजता कलशपूजन आणि मिरवणूक, मूर्ती अभिषेक, मूर्ती प्रतिष्ठापना, गुरुवारी (ता. २८) सकाळी ६ वाजता शिवज्योत आगमन, ९ वाजता मूर्ती अनावरण, मूर्तिपूजन, मानवंदना, लेझीम प्रात्यक्षिक, ऐतिहासिक चित्रप्रदर्शन, शालेय विद्यार्थ्यांचे कार्यक्रम, सत्कार समारंभ, मनोगत, शिवव्याख्यान, स्नेहभोजन, पालखी सोहळा, धनगरी नृत्य, पारंपरिक सनई वादन, लेझीम पथक, घुमटवादन आदी कार्यक्रमांचे आयोजन केले आहे.या

  2. कार्यक्रमाचे उद्घाटन पालकमंत्री रवींद्र चव्हाण यांच्या हस्ते प्रमुख अतिथी शालेय शिक्षणमंत्री दीपक केसरकर यांच्या उपस्थितीत करण्यात येणार आहे. आमदार वैभव नाईक, मादी पंचायत समिती सदस्य संदीप गावडे, शैलेश परब, राजन तेली, लखमराजे भोसले, महेश सारंग, संजू परब, सरपंच सावित्री पालेकर, श्रीकांत गावडे, शशिकांत गावडे, प्रकाश गावडे, केंद्रप्रमुख रामा गावडे, चौकुळ सरपंच बाबू शेटवे, गेळे सरपंच सागर ढोकरे, कानूर सरपंच देवेंद्र नार्वेकर, अवधुतानंद महाराज, परमानंद महाराज स्वामी समर्थ मठ आदी उपस्थित राहणार आहेत.
  3. प्रा. रुपेश पाटील यांचे उद्या शिवव्याख्यान :
    उद्या गुरुवार दिनांक २८ रोजी सुप्रसिद्ध शिवव्याख्याते प्रा. रुपेश पाटील यांचे शिवचरित्रावर मार्गदर्शनपर व्याख्यान होणार आहे. या सोहळ्यासाठी सर्वांनी उपस्थित राहण्याचे आवाहन राजे प्रतिष्ठानचे अध्यक्ष उल्हास गावडे यांनी केले आहे.
    ____________________________________
    बातम्या व जाहिरातसाठी संपर्क
    संपादक – शैलेश मयेकर
    9404778585, 8847701280
    ____________________________________
    👉कोकणभूमी चॅनल (KBC NEWS) च्या व्हाट्सअप चॅनलला जॉईन होण्यासाठी लिंक ला क्लिक करा👈
    https://whatsapp.com/channel/0029Va5wSM67j6g0OFP5ud1K
    ____________________________________

    👇कोकणभूमी चॅनल ऑट्सप ग्रुप ला जॉईन व्हा👇
    https://chat.whatsapp.com/FQ2fRbfdQI7HyWcNwzm0C6
    ____________________________________

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!