II KBC NEWS II
|| नाते विश्वासाचे ||
!! kokanbhumi channel !!

🖥️ दोडामार्ग | दि.२४ मार्च
दोडामार्ग तालुक्यातील ज्या – ज्या गावात मानपान इतर कारणावरून वाद विवाद आहे.अशा गावातील संबंधित दोन्ही गटातील ग्रामस्थांची बैठक दोडामार्ग तहसीलदार तथा दंडाधिकारी व पोलिस निरीक्षकांसमवेत बैठक झाली या बैठकीत तीन गावात समेट न झाल्याने पाल कुडासे खुर्द,शिरंगे, आयनोडे या तीन गावात होळी शिमगोत्सवास बंदी घालण्यात आली आहे.तसे आदेश काढण्यात आले आहेत अशी माहिती दोडामार्ग तहसीलदार अमोल पवार यांनी दिली.
तर उसप गावातील वाद मिटला आहे.एकत्रीत शिमगोत्सव साजरा करण्याबाबत समेट झाला आहे.

दोडामार्ग तालुक्यातील आयनोडे झरे या ठिकाणी देवस्थान वरून दोन गट निर्माण झाले आहेत.या ठिकाणी गेल्या काही वर्षापासून शिमगोत्सव तसेच इतर धार्मिक कार्यक्रम बंद आहेत. शिमगोत्सव साजरा करण्यासाठी आयनोडे भुतनाथ मंदिरात बैठक झाली पण एकमत होऊ शकले नाही.तर कुडासे खुर्द या ठिकाणी देखील शिमगोत्सव बंदी घातली आहे.शिरंगे पुनर्वसन या ठिकाणी दोन गट आहेत.त्यांच्यात देखील समझोता होऊ शकला नाही.दोडामार्ग तहसीलदार अमोल पवार,दोडामार्ग पोलिस निरीक्षक निर्भय ओतारी, यांच्या समक्ष देवस्थान वाद आहेत अशा चार गावातील संबंधित जबाबदार मंडळी सर्वांसबत चर्चा झाली.काही जणांनी वाद न करता शांततेत शिमगोत्सव साजरा केला जाईल असे सांगितले तर वरील तीन गावात तडजोड झाली नाही.दोडामार्ग तहसीलदार पोलिस निरीक्षक यांनी तीन गावातील ग्रामस्थ यांना तडजोड करण्यास बराच वेळ दिला.यात उसप गावातील ग्रामस्थ यांच्यात एकमत झाले.तर पाल खुर्द,शिरंगे,आयनोडे या तीन गावात एकमत झाले नाही. त्यामुळे त्या ठिकाणी बंदी घालून पोलिस बंदोबस्त तैनात करण्यात यावा अशा सूचना दोडामार्ग पोलिसांना देण्यात आल्या.तसे आदेश आहेत वरील तीन गावात मंदिर परिसरात जमावबंदी आदेश लागू केले आहेत.
____________________________________
बातम्या व जाहिरातसाठी संपर्क
संपादक – शैलेश मयेकर
9404778585, 8847701280
____________________________________
👉कोकणभूमी चॅनल (KBC NEWS) च्या व्हाट्सअप चॅनलला जॉईन होण्यासाठी लिंक ला क्लिक करा👈
https://whatsapp.com/channel/0029Va5wSM67j6g0OFP5ud1K
____________________________________

👇कोकणभूमी चॅनल ऑट्सप ग्रुप ला जॉईन व्हा👇
https://chat.whatsapp.com/FQ2fRbfdQI7HyWcNwzm0C6
____________________________________

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!