▪️रोख २० हजारांसह इतर किंमती वस्तू चोरीला…

II KBC NEWS II
|| नाते विश्वासाचे ||
!! kokanbhumi channel !!

🖥️ सावंतवाडी | दि.०७ मार्च
मुंबईच्या लोकमान्य तिलक टर्मिनस, कुर्ला येथून दिनांक ५ मार्च २०२४ रोजी ट्रेन नंबर ११०९९, मडगाव एक्सप्रेस या गाडीची सुटण्याची वेळ रात्री १२,४५ होती. सदर ट्रेन विलंबाने म्हणजे पहाटे ४.१५ ला निघाली. बोगी नंबर ए – १ टू टायर एसी, बर्थ नं ७ व ९ वर प्रवास करणारे पैकी विनोद सावंत व शोभा विनोद सावंत यापैकी शोभा सावंत ह्या झोपेत असताना सकाळी साडे सहाच्यानंतर पनवेल ते खेडच्या दरम्यान त्यांच्याजवळ असलेली पर्स चोरीला गेली. सदर पर्समध्ये अंदाजे पस्तीस हजार रुपये किंमतीचा मोबाईल , रोख रक्काम वीस हजारच्या आसपास, हिर्‍यांचे कर्णफूल अंदाजे पन्नास हजार , ATM कार्ड ,
डेबिट कार्ड , आधार कार्ड , पॅन कार्ड, क्रेडीट कार्ड , हेल्थ कार्ड, घड्याळ, घराची व तिजोरीच्या चाव्या अज्ञात चोराने लंपास केल्या. सदर जोडपे महाशिवरात्रीच्या निमीत्ताने मुंबईवरुन आकेरी, हुमरस ह्या त्यांच्या मूळगांवी येण्यासाठी निघाले होते. दरम्यान, रेल्वे पोलिसात सदर घटनेची तक्रार नोंद केली आहे.
____________________________________
बातम्या व जाहिरातसाठी संपर्क
संपादक – शैलेश मयेकर
9404778585, 8847701280
____________________________________
👉कोकणभूमी चॅनल (KBC NEWS) च्या व्हाट्सअप चॅनलला जॉईन होण्यासाठी लिंक ला क्लिक करा👈
https://whatsapp.com/channel/0029Va5wSM67j6g0OFP5ud1K
____________________________________

👇कोकणभूमी चॅनल ऑट्सप ग्रुप ला जॉईन व्हा👇
https://chat.whatsapp.com/FQ2fRbfdQI7HyWcNwzm0C6
____________________________________

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!