▪️ रोझारिओ मित्रमंडळ उभादांडाच्या वतीने सन्मान…

II KBC NEWS II
|| नाते विश्वासाचे ||
!! kokanbhumi channel !!

🖥️ वेंगुर्ला | दि.०५ मार्च
गूढ निर्माण करणाऱ्या गुन्ह्याच्या शोधकार्यात अतिशय महत्त्वपूर्ण भूमिका बजावणाऱ्या ‘फोरेन्सिक सायन्स’ या विषयात उभादांडा येथील कु.सॅंड्रा फर्नांडिस हिने महाराष्ट्र राज्यात प्रथम क्रमांक मिळवला.या तिच्या यशामुळे उभादांडा गावची मान उंचावली आहे.याची विशेष दखल घेऊन रोझारिओ मित्रमंडळ उभादांडाच्या वतीने रविवार दि ३ मार्च रोजी पूर्ण प्राथमिक शाळा नं २ उभादांडा येथे माजी गटशिक्षणाधिकारी रमेश पिंगुळकर,डॉ अभिजित वनकुद्रे,पाटकर हायस्कूल, वेंगुर्लाच्या शिक्षिका सौ समृद्धी पिळणकर – मूननकर,सिंधुरक्तमित्र प्रतिष्ठान सिंधुदुर्गचे गोवा ब्लड बँक समन्वयक संजय पिळणकर,तालुका कार्यकारिणी अध्यक्ष ॲलिस्टर ब्रिटो, रोझारिओ मित्रमंडळाचे अध्यक्ष डिक्सन ब्रिटो,न्यू इंग्लिश स्कूल उभादांडाचे माजी मुख्याध्यापक सावळाराम कांबळी सर,किशोर नरसुले गुरुजी,पिंटू गावडे,सिंधूरक्तमित्र प्रतिष्ठानचे खजिनदार भूषण मांजरेकर,सचिव श्रीकृष्ण कोंडूसकर, सहखजिनदार सचिन कोंडये व रोझारिओ मित्रमंडळाचे सर्व पदाधिकारी व सदस्यांच्या उपस्थितीत शाल,श्रीफळ व पुष्पगुच्छ देऊन सन्मान करण्यात आला.
____________________________________
बातम्या व जाहिरातसाठी संपर्क
संपादक – शैलेश मयेकर
9404778585, 8847701280
____________________________________
👉कोकणभूमी चॅनल (KBC NEWS) च्या व्हाट्सअप चॅनलला जॉईन होण्यासाठी लिंक ला क्लिक करा👈
https://whatsapp.com/channel/0029Va5wSM67j6g0OFP5ud1K
____________________________________

👇कोकणभूमी चॅनल ऑट्सप ग्रुप ला जॉईन व्हा👇
https://chat.whatsapp.com/FQ2fRbfdQI7HyWcNwzm0C6
____________________________________

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!