▪️हिंदुस्तान एरोनॉटिक्स व इन्फोसिसचीही केली पाहणी…

II KBC NEWS II
|| नाते विश्वासाचे ||
!! kokanbhumi channel !!
येथील यशवंतराव भोसले इन्स्टिट्यूट ऑफ टेक्नॉलॉजीच्या विद्यार्थ्यांनी नुकतीच इस्त्रोच्या बेंगलोर येथील यू.आर.राव सॅटेलाइट सेंटरला भेट दिली. कॉलेजच्या इंडस्ट्रियल व्हिजिट उपक्रमांतर्गत पाच ते दहा फेब्रुवारी या कालावधीत प्रथम वर्ष पदवी इंजिनिअरिंगच्या विद्यार्थ्यांसाठी ही भेट आयोजित करण्यात आली होती. या भेटीत कॉलेजचे ६३ विद्यार्थी व ५ शिक्षक सहभागी झाले होते.

_इस्त्रोचे हे केंद्र निरनिराळे सॅटेलाइट बनविणे व त्यासाठी आवश्यक तंत्रज्ञान विकसित करणे यासाठी प्रसिद्ध आहे. यावेळी शास्त्रज्ञ अनुराधा दोरास्वामी यांनी विद्यार्थ्यांना मार्गदर्शन केले.

या सोबतच विद्यार्थ्यांनी बेंगलोर येथील हिंदुस्तान एरोनॉटिक्स लिमिटेड (HAL) व इन्फोसिसच्या म्हैसूर येथील कार्यालयाला भेट दिली. हिंदुस्थान एरोनॉटिक्स ही लष्करी विमाने व संरक्षण सामग्री बनविणारी आघाडीची सरकारी कंपनी आहे. तसेच इन्फोसिस ही देशाची आघाडीची सॉफ्टवेअर कंपनी आहे. यावेळी इन्फोसिस ऑपरेशन स्पेशालिस्ट बी.रंगा यांनी विद्यार्थ्यांना मार्गदर्शन केले.

अशा प्रकारच्या व्हिजिट्समुळे विद्यार्थ्यांना शैक्षणिक अभ्यासक्रम व आधुनिक तंत्रज्ञान यांचा मेळ घालणे सोपे होते असे कॉलेजचे प्राचार्य डॉ.रमण बाणे यांनी सांगितले. या भेटीचे मुख्य समन्वयक म्हणून विभाग प्रमुख प्रा.स्वप्निल राऊळ यांनी जबाबदारी सांभाळली. त्यांना प्रा.मनोज खाडिलकर, प्रा.प्राजक्ता राणे, प्रा.गीता पाध्ये व प्रा.अँथनी फर्नांडिस यांचे सहकार्य लाभले.
_____________________________
बातम्या व जाहिरातसाठी संपर्क
संपादक – शैलेश मयेकर
9404778585, 8847701280
➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖
👉कोकणभूमी चॅनल (KBC NEWS) च्या व्हाट्सअप चॅनलला जॉईन होण्यासाठी लिंक ला क्लिक करा👈
https://whatsapp.com/channel/0029Va5wSM67j6g0OFP5ud1K
____________________________________

👇कोकणभूमी चॅनल ऑट्सप ग्रुप ला जॉईन व्हा👇
https://chat.whatsapp.com/FQ2fRbfdQI7HyWcNwzm0C6

____________________________________

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!