II KBC NEWS II
|| नाते विश्वासाचे ||
!! kokanbhumi channel !!

🖥️ सावंतवाडी | दि.२४ जानेवारी
सोशल मीडियावर हिंदू धर्मियांच्या भावना दुखावणारी जातीय वादग्रस्त पोस्ट शेअर केल्याप्रकरणी संशयीतावर गुन्हा दाखल करून त्यांना ताब्यात घ्या अशी मागणी सावंतवाडी शहरातील हिंदु बांधवानी केली. जोपर्यत संबंधितांना ताब्यात घेत नाही तोपर्यत आपण पोलीस ठाण्यातून मागे हटणार नाही अशी भुमिका उपस्थितनी घेतली.

दरम्यान संबंधित एका युवतीला सावंतवाडी पोलिसांनी ताब्यात घेतले आहे.यावेळी सावंतवाडी शहरातील अन्य काही जणांनीही तीच वादग्रस्त पोस्ट शेअर केल्याचे उघडकीस आले असून याबाबत उपस्थित हिंदु बांधवानी पोलीस उपविभागीय अधिकारी संध्या गावडे यांची भेट घेत संबंधितांवर कारवाई करण्याची मागणी केली आहे. यावेळी जय श्रीराम अशा घोषणा देत सावंतवाडी शहरात हिंदू बांधवांनी रॅली काढली यावेळी हिंदू बांधव मोठ्या संख्येने उपस्थित होते.

यावेळी भाजपचे सावंतवाडी विधानसभा प्रमुख तथा माजी आमदार राजन तेली,माजी नगराध्यक्ष संजू परब, माजी नगरसेवक मनोज नाईक, सुधीर आडिवरेकर, आनंद नेवगी, उत्कर्षा सासोलकर, भाजपचे शहराध्यक्ष अजय गोंदावळे, सिताराम गावडे, संजू शिरोडकर,निशांत तोरस्कर, दिलीप भालेकर, बंटी जामदार, केतन आजगांवकर , किशोर चिटणीस, प्रतिक बांदेकर, रुपेश कावले, बंटी पुरोहित, संदेश टेमकर, हेमंत बांदेकर, राजू केळुस्कर, अमित भराडी, प्रतिक नाईक, सुमित वाडकर, अजित सांगेलकर, सुधाकर राणे, विनोद सावंत, विनोद राऊळ, परेश बांवकर, सुकन्या टोपले, विशाखा रांगणेकर, गौरी राऊळ, मंजिरी धोपेश्वरकर, गायत्री देवस्थळी, अंजली नातू यांसह शेकडो हिंदू धर्मीय उपस्थित होते.
____________________________________
बातम्या व जाहिरातसाठी संपर्क
संपादक – शैलेश मयेकर
9404778585, 8847701280
____________________________________
कोकणभूमी चॅनल (KBC NEWS) च्या व्हाट्सअप ग्रुपला जॉईन होण्यासाठी लिंक ला क्लिक करा
https://whatsapp.com/channel/0029Va5wSM67j6g0OFP5ud1K ____________________________________
कोकणभूमी चॅनल ऑट्सप ग्रुप ला जॉईन व्हा
https://chat.whatsapp.com/FQ2fRbfdQI7HyWcNwzm0C6

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!