II KBC NEWS II
|| नाते विश्वासाचे ||
!! kokanbhumi channel !!

🖥️ सिंधुदुर्ग | दि.२४ जानेवारी
अंगणवाडी कर्मचाऱ्यांच्या संपाचा मंगळवार दि २३ जानेवारी रोजी ५० वा दिवस.या ५० दिवसात गावोगावी अंगणवाडी कर्मचाऱ्यांनी भरपूर आंदोलने झाली.आमदारांना निवेदने देऊन झाली.पण शासनावर त्याचा काही परीणाम होताना दिसत नाही. एवढे निगरगट्ट शासन उभ्या आयुष्यात आम्ही पाहीले नाही असे अंगणवाडी कर्मचारी सभेच्या सरचिटणीस
कमलताई परुळेकर म्हणाल्या.

मुख्यमंत्री,शिक्षणमंत्री व ग्रामविकास मंत्री यानी कृती समितीशी चर्चा केली.सचिव अनुप यादव व आयुक्त रूबल अग्रवाल यांच्याबरोबर मिटिंग सुध्दा झाली.तपशील चर्चेला आला,पण ते लेखी देणेस सरकारला काय अडचण आहे? आशाना ७ हजारो रुपये दरमहा मानधन वाढीचे आश्वासन देऊनही त्याना फसवले तसे सरकार अंगणवाडीला फसवू इच्छिते.? सरकारी अधिकारी यांच्यावर बंदूक ठेवून अंगणवाडी कर्मचाऱ्यांना नोटीसावर नोटीसा सरकार देत आहे,त्याच्या धसक्याने कोल्हापूर एक,भंडारा एक व धाराशिवच्या तीन भगिनी मरण पावल्या.अजून सरकार किती बळी घेणार?असेही त्या म्हणाल्या.

मंगळवारी संपाचा ५० वा दिवस, म्हणून आंदोलनाची पन्नाशी, आमदारांच्या दाराशी हा कार्यक्रम महाराष्ट्रभर अंगणवाडी कर्मचारी राबविणार असून आमदारांनी या प्रश्नात लक्ष घालावे यासाठी निवेदन देणार आहेत.असे कमलताई म्हणाल्या.
ज्या चर्चा मुख्यमंत्री,सचिव यांच्याशी झाल्या त्या अर्ध्या वगळून सचिव आम्हाला कळवतात आणि संप मागे घ्या सांगतात,सेविका,मदतनीसना दमदाटी करतात,हे थांबले पाहीजे किंवा हे सरकारपुरस्कृत असेल तर तसे जाहीर केले पाहीजे.केंद्रीय कामगार संघटनांनी २९ ला मुंबईत मोर्चा आयोजित केला आहे,त्यात अनुचित काही घडले तर ती शासनाची जबाबदारी असणार आहे असेही त्या म्हणाल्या.
____________________________________
बातम्या व जाहिरातसाठी संपर्क
संपादक – शैलेश मयेकर
9404778585, 8847701280
____________________________________
कोकणभूमी चॅनल (KBC NEWS) च्या व्हाट्सअप ग्रुपला जॉईन होण्यासाठी लिंक ला क्लिक करा
https://whatsapp.com/channel/0029Va5wSM67j6g0OFP5ud1K ____________________________________
कोकणभूमी चॅनल ऑट्सप ग्रुप ला जॉईन व्हा
https://chat.whatsapp.com/FQ2fRbfdQI7HyWcNwzm0C6

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!