II KBC NEWS II
!! kokanbhumi channel !!

🖥️ सावंतवाडी| दि.०८ जानेवारी
दोडामार्ग तालुक्यातील हत्ती बाधीत क्षेत्रातील शेतकरी व ग्रामस्थानी हत्तींच्या वाढत्या उपद्रवाला कंटाळुन सावंतवाडी वनविभाग येथे हत्तींचा कायमस्वरूपी बंदोबस्तासाठी दि.१०ऑगस्ट २०२३ रोजी आंदोलन केलं त्यानंतर आमदार दिपक केसरकर आणि माजी आमदार राजन तेली यांच्या मध्यस्थीनंतर मंत्रालय येथे बैठक घेण्याच्या आश्वासनानंतर सदर आंदोलन स्थगित करण्यात आलं त्यानंतर मंत्रालय येथे शेतकऱ्यांच्या प्रमुख दोन मागण्या १) हत्तींचा सदर क्षेत्रातुन कायमचा बंदोबस्त २)अत्यल्प मिळत असलेली नुकसान भरपाई वाढ यावर चर्चा होऊन त्यावर गणेश चतुर्थी पुर्वी निर्णय घेण्यात येईल असे आश्वासन वनमंत्री, पालकमंत्री आणि स्थानिक आमदार यांच्याकडुन देण्यात आले तसेच योग्य अशी नुकसान भरपाईसाठी शेतकरी आणि संबंधित विभाग यांची तातडीने बैठक घेऊन ती ३-४ पट वाढवुन देण्याचे आदेश वनमंत्री यांनी सदर बैठकीत दिले. त्यानुसार नुकसान भरपाई वाढीसाठी मा.दिपकभाई केसरकर व मा. राजन तेली आणि हत्ती हटाव शिष्टमंडळ, हत्ती बाधीत क्षेत्रातील शेतकरी तसेच संबंधित शासन विभाग यांच्या उपस्थितीत सावंतवाडी वनविभाग येथे दि.११ सप्टेंबर २०२३ रोजी बैठक घेऊन योग्य अशी नुकसान भरपाईची किंमत ठरवण्यात आली पण आज पर्यंत पाच महिने उलटुन गेले तरीही या दोन्ही मागण्यांवर निर्णय झालेला नाही. याउलट मंत्रालय येथील वनविभागाने हत्तींच्या तात्पुरत्या बंदोबस्ता संदर्भात सादर केलेल्या २५ कोटी रू. आराखड्याला मंजुरी देण्यात आलीय. ज्याला हत्ती हटाव शिष्टमंडळ आणि शेतकऱ्यांकडुन सदर बैठकीत विरोध करण्यात आला होता कारण ह्या उपाययोजना हत्ती बंदोबस्तासाठी अनुकुल नाहीत तसेच सदर क्षेत्राची भौगोलिक रचना ही वेगळी म्हणजेच डोंगराळ व घनदाट जंगलांची असल्यामुळे पश्चिम बंगालच्या धर्तीवर हत्तींना घालवणे शक्य नाही आणि यांची पुष्टि सुद्धा पश्चिम बंगाल वरून आलेल्या हत्ती हटाव पथकाचे प्रमुख. यांनी वनविभाग विश्रामगृह साटेली-भेडशी येथे झालेल्या बैठकीत दिली. आज चार महिने उलटुन गेले तरी शासनाकडुन कुठलीही ठोस उपाययोजना तसेच वाढीव नुकसानभरपाई वर निर्णय झालेला नाही . आता तर हत्तींचा कळपाचं पुन्हा आगमन होऊन मागील एक महिन्यापासुन हत्तींकडुन शेतकऱ्यांचं अतोनात नुकसान चालुच आहे.पण अजुनही शासन सदरच्या मागण्या पुर्ण करण्याच्या किंवा अन्य प्रभावी उपाययोजना राबवण्याच्या मनस्थितीत दिसत नाही आहे. अशा शासनाचा निष्क्रिय मनस्थितीमुळे इथल्या शेतकऱ्यांना आपली शेती, बागायती नष्ट होताना पहाण्या शिवाय आणि पर्याय उरलेला नाही. एकीकडे सरकार नवीन पिढीला शेतीकडे वळण्यासाठी आवाहन करतय, वेगवेगळ्या योजना आणतय आणि एकीकडे ह्या नष्ट होणारी शेती वाचवण्यासाठी इथले शेतकरी वारंवार शासनाच्या पायऱ्या झिजवत आहेत. ह्यावरून एकच दिसुन येतेय की ह्या मागे होऊन गेलेल्या तसेच तात्कालीन सरकारला पण एवढ़ंया गंभीर प्रश्नाशी काही देणं घेणं नाही. येत्या काळात होणाऱ्या निवडणुकांमध्ये यांचा प्रभाव दिसल्यास नवल वाटायला नको, कारण इथल्या नेतेमंडळींना या प्रश्नात कुठलाही रस दिसुन येत नाही याउलट मागच्या आंदोलनानंतर जो राजकारणाचा ऊत आलेला तो तसाच सदर प्रश्न मार्गी लागे पर्यंत राहीला असता तर ह्यावर आजपर्यंत काहीतरी मार्ग निघाला असता.

पंकज पांडुरंग गवस

हत्ती हटाव शिष्ट मंडळ

____________________________________
बातम्या व जाहिरातसाठी संपर्क
संपादक – शैलेश मयेकर
9404778585, 8847701280
____________________________________
कोकणभूमी चॅनल (KBC NEWS) च्या व्हाट्सअप ग्रुपला जॉईन होण्यासाठी लिंक ला क्लिक करा
https://whatsapp.com/channel/0029Va5wSM67j6g0OFP5ud1K ____________________________________
कोकणभूमी चॅनल ऑट्सप ग्रुप ला जॉईन व्हा
https://chat.whatsapp.com/FQ2fRbfdQI7HyWcNwzm0C6

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!