▪️ डॉक्टर राजेश नवांगुळ यांच्या फार्म हाऊस मध्ये आढळला नाग…

II KBC NEWS II
!! kokanbhumi channel !!
|| नाते विश्वासाचे ||
🖥️ सावंतवाडी|शैलेश मयेकर : दि.०८ जानेवारी
येथील डॉक्टर राजेश नवांगुळ यांच्या तळवडे येथील फार्म हाऊस मध्ये आज अंदाजे चार फूट लांब नाग आढळला या नागाला सर्पमित्र ओंकार गावडे नेमळे यांनी पकडून नैसर्गिक अधिवासात सोडून दिले.

सावंतवाडी यशराज हॉस्पिटल चे स्त्री रोग व प्रसूतीशास्त्रज्ञ डॉक्टर राजेश नवांगुळ यांच्या तळवडे येथील फार्म हाऊस मध्ये आज सकाळी नाग घुसला होता याची माहिती जयदीप सावंत यांनी डॉक्टर मनीषा नवांगुळ यांना दिली. माहिती मिळताच हॉस्पिटलचे कर्मचारी परेश सावंत यांनी सर्पमित्र ओंकार गावडे नेमळे यांना संपर्क साधून साप पकडण्यास प्राचारण केले. श्री गावडे यांनी तात्काळ घटनास्थळी जाऊन अंदाजे चार फूट असलेल्या नागाला पकडून नैसर्गिक अधिवासात सोडून त्याला जीवदान दिले. यावेळी डॉक्टर नवांगुळ यांनी सर्पमित्र ओंकार गावडे यांचे आभार मानले.

दरम्यान सर्पमित्र ओंकार गावडे यांनी सापाबद्दल माहिती देत साप वाचवा निसर्ग वाचवा तसेच आपल्या आजूबाजूच्या परिसरात साप आढळल्यास त्याला न मारता 8999586504 या संपर्क नंबर वर संपर्क करून माहिती द्यावी असे आवाहन केले.

यावेळी याकमी रवी जाधव यांनी मदत केली.
____________________________________
बातम्या व जाहिरातसाठी संपर्क
संपादक – शैलेश मयेकर
9404778585, 8847701280
____________________________________
कोकणभूमी चॅनल (KBC NEWS) च्या व्हाट्सअप ग्रुपला जॉईन होण्यासाठी लिंक ला क्लिक करा
https://whatsapp.com/channel/0029Va5wSM67j6g0OFP5ud1K ____________________________________
कोकणभूमी चॅनल ऑट्सप ग्रुप ला जॉईन व्हा
https://chat.whatsapp.com/FQ2fRbfdQI7HyWcNwzm0C6

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!