II KBC NEWS II
!! kokanbhumi channel !!
🖥️ म्हापसा | संजय पिळणकर: दि.३१ डिसेंबर
कळंगुट पोलिसांनी नायकावाडी परिसरात केलेल्या कारवाईत मोस्ताफिजुल मंडल (वय- ३५,रा पश्चिम बंगाल) याच्याकडून ९४ हजार रुपये किंमतीचा व ९४० ग्रॅम वजनाचा गांजा जप्त केला आहे. ही कारवाई शुक्रवारी रात्री करण्यात आल्याची माहिती पोलीस निरीक्षक परेश नाईक यांनी दिली.संशयीत अंमली पदार्थाची विक्री करण्यासाठी येणार असल्याची माहिती पोलिसांना मिळताच त्यानुसार सापळा रचण्यात आला.यावेळी ग्राहकाच्या प्रतीक्षेत असताना संशयीताला अटक करण्यात आली.अधिक चौकशीसाठी त्याची रवानगी पोलीस कोठडीत करण्यात आली असून पुढील तपास उपनिरीक्षक राजाराम बागकर करत आहेत.
____________________________________
बातम्या व जाहिरातसाठी संपर्क
संपादक – शैलेश मयेकर
9404778585, 8847701280
____________________________________
कोकणभूमी चॅनल (KBC NEWS) च्या व्हाट्सअप ग्रुपला जॉईन होण्यासाठी लिंक ला क्लिक करा
https://whatsapp.com/channel/0029Va5wSM67j6g0OFP5ud1K ____________________________________
कोकणभूमी चॅनल ऑट्सप ग्रुप ला जॉईन व्हा
https://chat.whatsapp.com/FQ2fRbfdQI7HyWcNwzm0C6