II KBC NEWS II
!! kokanbhumi channel !!

🖥️ दोडामार्ग I दि.०४ नोव्हेंबर
तालुक्यातील कोनाळ – तिलारीवाडी येथे शंकर शेटवे यांच्या शेतविहिरीत दोन गव्या रेड्यांचा पडून मृत्यू झाल्याची घटना आज शनिवारी उघडकीस आली.सदर विहीरिला संरक्षक कठडा नसल्याने रात्रीच्या वेळी शेतात आलेल्या गव्या रेड्यांना अंदाज न आल्याने नर व मादी अशा दोन गव्यांचा मृत्यू झाला.परिसरात दुर्गंधी पसरल्याने शेटवे यांच्या ही घटना उघडकीस आली.त्यामुळे ही घटना चार ते पाच दिवसांपूर्वी घडली असल्याचा अंदाज व्यक्त होत आहे.

याबाबत वनविभागाला माहिती देण्यात आली,त्यानुसार वनविभागाचे दोडामार्ग वनक्षेत्रपाल वैशाली मंडल, वनपाल किशोर जंगले,विश्राम कुबल, प्रकाश गवस,बाळकृष्ण सावंत आदींनी उपस्थित राहून पंचनामा केला.
________________________________
बातम्या व जाहिरातसाठी संपर्क
संपादक – शैलेश मयेकर
9404778585, 8847701280
➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖
👉कोकणभूमी चॅनल (KBC NEWS) च्या व्हाट्सअप चॅनलला जॉईन होण्यासाठी लिंक ला क्लिक करा👈
https://whatsapp.com/channel/0029Va5wSM67j6g0OFP5ud1K
________________________________

👇कोकणभूमी चॅनल ग्रुप ला जॉईन व्हा👇
https://chat.whatsapp.com/FQ2fRbfdQI7HyWcNwzm0C6

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!