*_II KBC NEWS II_*
kokanbhumi
*_🖥️ गोवा | संजय पिळणकर :दि.१७ मार्च_*
पर्यटकाने हणजुण येथे एका मोटरसायकलला ओव्हरटेक केल्याने रागाने पर्यटक जोडप्याला मारहाण करून गंभीर जखमी केल्याप्रकरणी हणजुण पोलिसांनी विराज दीपक पार्सेकर (वय-२५) व सिद्धांत श्रीपाद खोर्जुवेकर (वय-२९) दोघेही राहणार (कामुर्ली) यांना अटक करून तीन दिवसांची पोलिस कोठडी देण्यात आली आहे.
सविस्तर वृत्त असे की,मंगळवार दि १४ मार्च रोजी रात्री १० च्या दरम्यान हणजुण पोलिस नियंत्रण कक्षाला हणजुण पेट्रोलपंपाजवळ मारामारी सुरू असल्याचा फोन आला. त्यांनी तात्काळ ही बाब हणजुण पोलिसांना कळविल्यानंतर पोलिस निरीक्षक प्रशाल देसाई यांनी उपनिरीक्षक साहिल वारंग,उपनिरीक्षक स्नेहा वारंग व अन्य सहकाऱ्यांसोबत घटनास्थळी धाव घेतली.तेव्हा तेथे एका कारमध्ये तक्रारदार ओंकार उपवणे (रा.कल्याण,मुंबई) हे जखमी अवस्थेत आढळले.तसेच त्यांच्या कारची मोडतोड करण्यात आल्याचे दिसून आले. पोलिसांनी जखमी पर्यटकास म्हापसा येथील जिल्हा रुग्णालयात उपचारासाठी दाखल केले.
तक्रारदार उपवणे यांनी दिलेल्या माहितीनुसार,त्यांच्या कारने (जि ए ०३ एके ५८५६) या मोटरसायकलला ओव्हरटेक केल्याने मोटारसायकलवरील त्या दोघा युवकांनी आपली मोटारसायकल पुढे आणून कार अडवली.नंतर कारमधील उपवणे यांच्या डोक्यावर सिमेंटची वीट मारून गंभीर दुखापत केली.तसेच त्यांच्या कारची मोडतोड केली.
हणजुण पोलिसांनी संशयितांविरुद्ध कलम ३४९,३५२,५०४,४२७ व ३०८ अन्वये गुन्हा दाखल करण्यात आला.त्यानुसार अवघ्या दोन तासात हणजुण पेट्रोलपंपावरील सीसीटीव्ही फुटेज वरून मारहाण करणाऱ्या संशयितांच्या मोटारसायकलचा क्रमांक आढळला.त्यानुसार दोन्ही संशयितांना दोन तासात अटक करून न्यायालयात हजर केले असता त्यांना तीन दिवसांची पोलिस कोठडी सुनावण्यात आली.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!